नियोजनाअभावी पाण्याचा अपव्यय

By Admin | Published: March 6, 2017 12:35 AM2017-03-06T00:35:36+5:302017-03-06T00:37:31+5:30

बीड : मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे नियोजनाकडे न.प.चे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

Water wastage due to lack of planning | नियोजनाअभावी पाण्याचा अपव्यय

नियोजनाअभावी पाण्याचा अपव्यय

googlenewsNext

बीड : मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे नियोजनाकडे न.प.चे दुर्लक्ष होऊ लागले आहे. शहराला आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असला तरी रात्री-अपरात्री सोडण्यात आलेले पाणी तब्बल १४-१४ तास सुरू राहत आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.
आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या पावसामुळे सद्यस्थितीस बिंदुसरा, माजलगाव धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असले तरी गतवर्षीच्या टंचाईच्या झळा न विसरण्यासारख्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीसंकट लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन होणे गरजेचे आहे. आठ दिवसाचा पाणीपुरवठा चार दिवसांवर करून वेळेचे बंधन अवलंबण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील आदित्यनगरी, भक्ती कन्स्ट्रक्शन, बालेपीर भागामध्ये शनिवारी रात्री सुरू झालेला पाणीपुरवठा रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत सुरूच होता. त्यामुळे भर उन्हाळ्यातही रस्त्यावर पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. धरणामध्ये पाणीसाठा असला तरी भविष्यातील टंचाई लक्षात घेता नियोजन गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Water wastage due to lack of planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.