मदतीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:38 AM2021-09-12T04:38:35+5:302021-09-12T04:38:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : उद्ध्वस्त झालेली पिके, खरडून वाहून गेलेल्या जमिनी, फुटलेले तलाव हे सर्व पाहताना माजी आमदार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : उद्ध्वस्त झालेली पिके, खरडून वाहून गेलेल्या जमिनी, फुटलेले तलाव हे सर्व पाहताना माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासमोर नुकसानग्रस्तांनी आपल्या व्यथा, वेदना आणि दुःख मांडले. अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांंना धीर देऊन नुकसानग्रस्तांना सरसकट मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.
जातेगाव गटातील दहा गावांना अमरसिंह पंडित यांनी भेटी दिल्या. तर विजयसिंह पंडित यांनी उमापूर आणि शेकटा भागात थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांंच्या नुकसानीची पाहणी करून धीर दिला. भेंड (खुर्द), भेंड (बुद्रूक), खेर्डा, नंदपूर, मारफळा, यमगरवाडी, सेलू, टाकळ गव्हाण, बाबुलतारा आदी गावांत पंडित यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे फुटलेले तलाव, खरडून वाहून गेलेल्या शेतजमिनीची त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांंना तेथून दूरध्वनीद्वारे संपर्क करून पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले. या वेळी माऊली आबुज, वसंतराव उबाळे, शेख मिनहाज, शाम मुळे, प्रकाश जगताप, मोहन कुटे, नारायण डरफे, रवी शिर्के यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
...
सरकार पाठीशी
महाविकास आघाडीचे सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी असल्याचा विश्वास पंडित यांनी यानिमित्ताने दिला. सरसकट सर्वांना शासनाकडून मदत मिळेल. रस्ते, पूल आणि फुटलेल्या तलावाच्या संदर्भात लवकरच कृती आराखडा तयार करून दुरुस्तीची कामे सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
110921\sakharam shinde_img-20210911-wa0011_14.jpg
जातेगाव गटातील दहा गावांना अमरसिंह पंडित यांनी भेटी दिल्या.