डबल मास्क घाला; कोरोना टाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:54 AM2021-05-05T04:54:35+5:302021-05-05T04:54:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याला रोखण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन व उपाययोजना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याला रोखण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन व उपाययोजना केल्या जात आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवायाही केल्या जात आहेत. असे असले तरी काही लोक विनामास्क फिरत आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यात डबल मास्क वापरणे खूप आवश्यक आहे. यामुळे संसर्ग टाळून आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. मास्क बरोबरच सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर आणि वारंवार हात धुणे हे करणेदेखील महत्त्वाचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
विनामास्क फिरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत जिल्हाभरातून लाखो रुपयांचा दंड वसूलही केला आहे. वारंवार आवाहनही केले जात आहे; परंतु तरीही काही लोक आजही विनामास्क फिरत आहेत. आरोग्य विभागाने केलेल्या सुचनांचे पालन होत नाही. कोरोना टाळण्यासाठी आता सिंगल नव्हे तर डबल मास्क वापरावा.
मास्क व्यवस्थित वापरणे गरजेचे
n सध्यातरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क हा पर्याय आहे. लोकांनी मास्कबाबत गाफील राहू नये. एकमेकांना बोलताना विषाणू तोंडातून अथवा नाकातून आत प्रवेश करू शकतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह मास्क असल्यास विषाणू आत प्रवेश करणार नाहीत.
n शासन, प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. काही लोक दंडात्मक कारवाई करूनही विनामास्क बाहेर फिरत आहेत. हे चूक असल्याचे तज्ज्ञ म्हणतात.
मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळा
n पोलिसांचे पैसे वाचविण्यासाठी काही लोक हनवटीवर मास्क ठेवून तोंड व नाक मोकळे ठेवून फिरतात; परंतु हे चूक असून, यामुळे आपल्यालाच धोका आहे. त्यासाठी मास्क व्यवस्थित व नवीन वापरावा. कापडी मास्क पण डबल नव्हे तर ट्रीपल असला पाहिजे. जेव्हा जेव्हा घराबाहेर पडाल तेव्हा तेव्हा मास्क तोंंडाला कायम असावा.
प्रत्येकाने एन-९५ मास्क वापरावा. तो नसेल तर सर्जीकल डबल वापरावा. मास्क घालताना नाक आणि तोंड हे दोन्ही झाकेल, अशा पद्धतीने घालावा. जेणेकरून विषाणू आतमध्ये जाणार नाहीत. चेहऱ्याला व्यवस्थित बसणारा मास्क वापरावा. मास्कला वर असणारी पट्टी नाकावर व्यवस्थित बसविल्यास लिक होणार नाही. मास्कसोबत, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स आणि हात नेहमी धुवावेत.
डॉ. अनिल बारकुल, वैद्यकीय तज्ज्ञ, बीड.
मास्क व्यवस्थित वापरावा. एकदा मास्क घातल्यावर त्याला वारंवार हात लावू नये, अथवा काढण्याचा प्रयत्न करू नये. मास्क हनवटीवर ठेवून तोंड व नाक उघडे ठेवणे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे. केवळ वापरायचा म्हणून मास्क वापरू नये, तर त्याचा उपयोग पूर्णपणे हाेईल, याची काळजी घ्यावी. गर्दीत जाणे टाळा, विनाकारण घराबाहेर पडू नका. हस्तांदोलन टाळावे.
डॉ. आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.