पीव्हीपी महाविद्यालयात वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:33 AM2021-02-10T04:33:44+5:302021-02-10T04:33:44+5:30

पाटोदा : येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील ...

Webinar at PVP College | पीव्हीपी महाविद्यालयात वेबिनार

पीव्हीपी महाविद्यालयात वेबिनार

Next

पाटोदा : येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील वेबिनार संपन्न झाले.

महाविद्यालयाच्या गृहशास्त्र विभागाच्या वतीने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ‘बूस्ट युअर इम्युनिटी’ या विषयावर नागपूर येथील व्हीएमव्ही कॉमर्स, जीएमटी आर्ट्स आणि जेजेपी सायन्स महाविद्यालयाच्या गृहशास्त्र विषयाच्या प्रा. डॉ. सीमा पांडे यांनी सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यशस्वितेसाठी गृहशास्त्र विभागाच्या प्रा. अर्चना चवरे व प्रा. मनीषा गाढवे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. अमोल भालेराव, प्रा. मुख्तारखान पठाण, प्रा. बालाजी घोडके, प्रा. पवनकुमार चांडक यांनी तांत्रिक साह्य केले.

आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. बळीराम राख, उपप्राचार्य डॉ. किशोर मचाले, पदव्युत्तर विभाग संचालक प्रा. डॉ. मनोजकुमार प्रकाश, उपप्राचार्य प्रा. नंदकुमार पटाईत, पर्यवेक्षक प्रा. रमेश टाकणखार यांचे मार्गदर्शन लाभले. वेबिनारमध्ये विविध राज्यांमधून ९६ जणांनी सहभाग नोंदवला.

कारणे, उपाय अन् शंकांचे निरसन

रोगप्रतिकारशक्ती कमी असण्याची विविध कारणे, वाढविण्याचे उपाय, पौष्टिक व समतोल आहार, व्यायामाचे महत्त्व आदी विविध बाबींवर प्रा. डॉ. सीमा पांडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच सहभागींच्या अनेक प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले.

Web Title: Webinar at PVP College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.