कालवा फुटून आठवडा लोटला, तरीही बुजविण्याच्या हालचाली थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:40 AM2021-09-14T04:40:13+5:302021-09-14T04:40:13+5:30
तालुक्यातून गेलेल्या पैठण उजवा कालव्याची गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यात बागपिंपळगाव शिवारातील पैठण उजवा ...
तालुक्यातून गेलेल्या पैठण उजवा कालव्याची गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यात बागपिंपळगाव शिवारातील पैठण उजवा कालवा ६ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाने फुटला होता. त्यातून पाणी वाहिल्याने परिसरातील शेतकरी हौसाबाई कांबळे, जर्नाधन चितळकर, लाला कांबळे, कचरू साबळे या सहा-सात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या मोठ्या प्रमाणात शेतात पाणी असल्याने पिके सडत आहेत.
दुरुस्तीचे काम लवकरच
बागपिंपळगाव जवळील फुटलेला उजवा कालवा परिसरात चिखल असल्याने वाहन जात नसल्यामुळे अडचणी येत आहेत. फुटलेला भाग लवकरच बुजवण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाचे बागपिंपळगाव शाखा अधिकारी एन. एन. जगताप यांनी सांगितले.
130921\20210913_161517_14.jpg~130921\20210913_161852_14.jpg