बीडमध्ये बाप्पांचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:39 AM2018-09-14T00:39:13+5:302018-09-14T00:39:45+5:30

पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला... यासारख्या गाण्यांवर गणेश भक्तांनी ठेका धरत लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया...’ असा जयघोष करीत गणेश भक्तांनी गणरायाची मिरवणूक काढली. लाडक्या बाप्पांना घरी नेण्यासाठी बााजरात दिवसभर गणेश भक्तांची लगबग दिसून आली.

Welcome to the Babap Sankalp in Beed | बीडमध्ये बाप्पांचे जल्लोषात स्वागत

बीडमध्ये बाप्पांचे जल्लोषात स्वागत

googlenewsNext

बीड : पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला... यासारख्या गाण्यांवर गणेश भक्तांनी ठेका धरत लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया...’ असा जयघोष करीत गणेश भक्तांनी गणरायाची मिरवणूक काढली. लाडक्या बाप्पांना घरी नेण्यासाठी बााजरात दिवसभर गणेश भक्तांची लगबग दिसून आली.

पंधरा दिवसांपासून गणेश मंडळांकडून गणरायाच्या स्वागताची तयारी केली जात होती. गतवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे भक्तांचा आनंद द्विगुणित झाला होता. परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्याने उत्साह थोडा कमी जाणवला.

तरी सुद्धा श्रद्धा म्हणून सकाळी आठ वाजेपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडत गणेश मूर्ती खरेदी केल्या. संपूर्ण कुटूंब सहभागी होत अनेकांनी बाप्पांची मिरवणूक काढली. दुपारपर्यंत हा ओघ कायम होता. बीडमधील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरात लावलेल्या स्टॉलच्या ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास मोठ्या गणेश मंडळांनी मिरवणूका काढण्यास सुरूवात केली. अनेकांनी पारंपरिक वाद्याला अधिक महत्व दिले.

ढोल, ताशा, लेझीम अन् डॉल्बीच्या तालावर भक्तांनी लाडक्या बाप्पांचे स्वागत केले. मिरवणूकीनंतर विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना केली.
जिल्ह्यात १४४० ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आलेली आहे. ३६० गावांमध्ये एक गाव एक गणपती, ६३ गावांमध्ये एक गाव दोन गणपती, तर ६ ठिकाणी दोन गाव एक गणपती संकल्पना राबवि यात आली. यामुळे गणेशोत्सवात मदतच होणार असल्याचे विशेष शाखेचे सपोनि ए. एच. जगताप यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत जिल्हा विशेष शाखेचे पथक ही माहिती गोळा करीत होते.

बीडमध्ये पोलिसांची मनमानी
बीड शहरात वाहन पार्किंगसाठी सिद्धीविनायक कॉम्प्लेक्सचा परिसर आहे. येथे स्टॉल उभारल्याने अनेकांनी वाहने सुभाष रोडवर उभी केली. हीच संधी साधून पोलिसांनी या वाहनांवर कारवाई केली. पार्किंग व्यवस्थाच नसेल तर वाहने लावायची कोठे, असा सवाल उपस्थित करीत पोलिसांच्या मनमानीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. दिवसभर शहरात पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. बीड पोलिसांच्या हलगर्जीपणाचा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वाहतुकीतील बदलाची कसलीही कल्पना नागरिकांना दिलेली नव्हती. तसेच कसलेही नियोजन केले नसल्याचे दिसून आले.

माजलगाव तालुक्यात १४० मंडळांची आॅनलाईन नोंदणी
माजलगाव : तालुक्यात १४० गणेश मंडळांनी गुरूवारी दुपारपर्यंत आॅनलाईन नोंदणी केली. मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केली असून ग्रामीण भागात ५० तर शहरी भागात ७० मंडळांनी आॅनलाईन परवानगी घेतली आहे. २० गावांत एक गाव एक गणपती बसविण्यात आला आहे. एका ठिकाणी दोन गाव एक गणपतीची नोंद करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, माजलगाव शहरातील नावाजलेले शिवाजी, गणेश, क्रांती, नवतरुण, छत्रपती, राजस्थानी, मोंढा, कालिका, नवतरुण, स्वराज्य आ दी गणेश मंडळांनी गणेशोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. गणेशोत्सव शांततेत आणि सामाजिक सलोख्यात साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नवगण राजुरीत ग्रामदेवतांना जलाभिषेक
नवगण राजुरी येथे गणेशोत्सवानिमित्त गंगेचे पाणी कावडीने आणत नवगणेशाला व ग्रामदेवतांना जलाभिषेक घालण्यात आला.
गावातील २०० युवकांनी शहागड येथून गोदावरी नदीचे पाणी कावडीने आणले. यावेळी कावडीचे सवाद्य स्वागत करण्यात आले.
जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर, मंगलमूर्ती देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, आचार्य अमृताश्रम महाराज, सरपंच गणेश ससाणे, उपसरपंच भगवान बहिर, माउलीअण्णा बहिर, मोहन देशमुख यांच्यासह गणेश भक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Welcome to the Babap Sankalp in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.