हलगी वाजवत मिरवणूक काढून फुलांच्या वर्षावात केले मुलीच्या जन्माचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:32 AM2021-01-20T04:32:50+5:302021-01-20T04:32:50+5:30
आवरगाव येथील दत्ता बाबासाहेब जगताप हे गेली पाच वर्षांपासून उस्मानाबाद येथे बियाणे महामंडळात वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत ...
आवरगाव येथील दत्ता बाबासाहेब जगताप हे गेली पाच वर्षांपासून उस्मानाबाद येथे बियाणे महामंडळात वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत बाहेरगावी असतात. ते कोणत्याही व्यक्तीला बाहेरगावी राहतात असे वाटत नाही. गावाशी त्यांची नाळ अत्यंत घट्ट आहे. दर शनिवारी, रविवारी व इतर सुट्टीच्या दिवशी ते गावामध्ये येऊन अनेक सार्वजनिक व सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारे संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना चार महिन्यांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले आणि १८ जानेवारी रोजी दत्ता जगताप यांची कन्या आवरगावमध्ये आल्यानंतर प्रथम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच अमोल जगताप यांच्या संकल्पनेतून त्यांच्यासह ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य व ग्रामस्थांनी एकत्रित येत त्यांचे यथोचित स्वागत करून त्यांना भेट म्हणून वृक्ष रोपटे दिले.
हा अनोखा उपक्रम करणारे धारुर तालुक्यातील प्रथम आवरगाव हे प्रथम गाव आहे.
दत्ता बाबासाहेब जगताप व त्यांच्या परिवारानेदेखील मुलीच्या हाताने म्हणजेच अद्विताच्या हाताने ग्रामपंचायत कार्यालयाला शिवराज्याभिषेक प्रतिमा भेट देऊन आभार व्यक्त केले. सरपंच अमोल जगताप यांनी असेच उपक्रम आपल्या गावात राबवावेत, असे आवाहन केले.