आपेगाव कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनामुक्त रुग्णांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:05+5:302021-05-28T04:25:05+5:30

अंबाजोगाई : वेळेवर निदान, योग्य औषधोपचार, आहार घेतल्यानंतर कोरोनावर मात करता येते, हे पुन्हा एकदा दिसून आले. कोरोनाकाळात ...

Welcome to Corona Free Patients at Apegaon Kovid Care Center | आपेगाव कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनामुक्त रुग्णांचे स्वागत

आपेगाव कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनामुक्त रुग्णांचे स्वागत

Next

अंबाजोगाई : वेळेवर निदान, योग्य औषधोपचार, आहार घेतल्यानंतर कोरोनावर मात करता येते, हे पुन्हा एकदा दिसून आले. कोरोनाकाळात कुटुंबातील सदस्य म्हणून काळजी घेतल्याने तालुक्यातील आपेगाव येथे सहाजण कोरोनामुक्त झाले. त्यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे सदस्य राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

आपेगाव येथे रुग्णांना ठणठणीत बरे करून कोरोनामुक्त केले जात आहे. हे संकटकाळात एक आशादायी चिञ दिसून येत आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग, बीड, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडिया) संस्था, अंबाजोगाई यांच्यातर्फे तसेच मानवलोक संस्था, अंबाजोगाई, ग्रामपंचायत आपेगाव आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या मदतीने श्री जयकिसान महाविद्यालय, आपेगाव या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. यामध्ये कोरोनाबाधित व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर मोफत औषधोपचार करून रुग्णांना रोज योगाचे धडे, योग्य औषधोपचार, पौष्टिक आहार, आयुर्वेदिक काढा दिला जात आहे.

याचा फायदा असा झाला की, बाधित रुग्ण हे लवकर कोरोनामुक्त होत आहेत. अशाच सहाजणांचा मंगळवारी कोविड केअर सेंटरमधून शाल व गुलाबपुष्प देऊन राजेसाहेब देशमुख, अभिजित गाठाळ, नीलेशराव शिंदे व इतरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसेच या वेळेस प्रतिकार क्षमता वाढविणारी औषधे देऊन सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली.

याप्रसंगी कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांनी आपले सकारात्मक अनुभव कथन केले, तर काहींनी ते लेखीही नोंदविले आहेत. आपेगाव कोविड केअर सेंटरमधून दर्जेदार आरोग्यसेवा, सुविधा मिळत असल्याचे सांगून त्यांनी पुनर्जन्म मिळाल्याची माहिती दिली. यावेळी राजेसाहेब देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागात कोरोनाबाधित व गरजू रुग्णांच्या उपचारासाठी होणारी ससेहोलपट थांबावी व त्यांना तत्पर, दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा व सोय उपलब्ध व्हावी, याच विधायक उद्देशाने आपेगाव येथे स्त्री व पुरुष रुग्णांसाठी उपचारांची स्वतंत्र व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

तालुका आरोग्याधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भारत नागरे, डॉ. अजय ठोंबरे, डॉ. धनेश्वर मेनकुदळे, डॉ. व्यंकट बेंबडे, डॉ. फड, डॉ. गायत्री ढमाले, परिचारिका कावरे, ढाकणे, कराड, देशमुख, मुंडे, जगदाळे, शिंदे तसेच कर्मचारी अशोक राऊत, बालाजी वाघमारे, रवी सरवदे, अजित बनसोडे, आदींच्या सहकार्यातून रुग्णांवर औषधोपचार करून त्यांना योगाभ्यासाचे धडे, पौष्टिक आहार, आयुर्वेदिक काढा, हळदीचे दूध, औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या अर्कयुक्त औषधी देण्यात येत आहेत. या कामी त्यांना नीलेशराव शिंदे, जयजितबापू शिंदे, प्रवीण देशमुख, राजाभाऊ देशमुख, बाळासाहेब जगताप, आश्रुबा करडे, बळिराजे वाघमारे, बालासाहेब तट, पिंटू शिंदे, भास्कर पाटील, शेख अस्लम यांचे सहकार्य लाभत आहे. मागील काही दिवसांत आपेगाव कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्ण ठणठणीत बरे व कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

===Photopath===

270521\img-20210525-wa0136_14.jpg

Web Title: Welcome to Corona Free Patients at Apegaon Kovid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.