मुक्ताबाई पालखीचे पेठ बीडमध्ये स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:16 AM2019-07-01T00:16:46+5:302019-07-01T00:17:14+5:30
शहरातील माळीवेस भागातील हनुमान मंदिरात मुक्कामानंतर संत मुक्ताबाई पालखीचे रविवारी शहरातील पारंपरिक मार्गाने प्रस्थान झाले. त्यानंतर पेठ बीड भागात स्वागत करण्यात आले.
बीड : शहरातील माळीवेस भागातील हनुमान मंदिरात मुक्कामानंतर संत मुक्ताबाई पालखीचे रविवारी शहरातील पारंपरिक मार्गाने प्रस्थान झाले. त्यानंतर पेठ बीड भागात स्वागत करण्यात आले. सायंकाळी पालखी सोहळा बालाजी मंदिरात मुक्कामी विसावला.
आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताईनगर येथून ८ जून रोजी निघालेला संत मुक्ताबार्इंचा पालखी सोहळा शनिवारी बीडमध्ये पोहोचला. ३१० वर्षांपासून माळीवेस हनुमान मंदिरात पालखीचा मुक्काम असतो. सोमवारी वेळापत्रकानुसार पालखीला हनुमान मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. आरती व हरिपाठानंतर धोंडीपुरा, बलभीम चौक, खडकपुरा हिरालाल चौक मार्गे पालखीचे बालाजी मंदिर सभागृहात आगमन झाले.
पालखी मार्गावर शेकडो महिला- पुरुष भाविकांनी दर्शन घेतले. आदिशक्ती मुक्ताबार्इं आणि हरिनामाचा गजर करत पालखी मार्गावर वारकरी महिलांनी फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला. अभंग आणि भजनाच्या चालीवर टाळकऱ्यांची पावली आकर्षण होती.
पंढरपूरकडे प्रस्थान करण्याआधी पालखीला निरोप देताना बीड शहरात मल्लखांब, लेझीम इ. विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होत असे, मात्र अनेक वर्षांपासून मल्लखांब, लेझीमचे खेळ होत नाहीत. बॅँडपथक मात्र मनोभावे वाजंत्री वाजवत मोफत सेवा देत आहेत.