‘संगीत रजनी’चे महिला वर्गातून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:35 PM2020-01-01T23:35:00+5:302020-01-01T23:37:12+5:30
मागील ५ वर्षापासून ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शिवसंग्रामच्या वतीने व्यसनमुक्तीचा संदेश देत संगीत रजनीचा कार्यक्रम घेतला जातो. यावेळी व्यसन न करण्याची शपथदेखील दिली जाते.
बीड : मागील ५ वर्षापासून ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शिवसंग्रामच्या वतीने व्यसनमुक्तीचा संदेश देत संगीत रजनीचा कार्यक्रम घेतला जातो. यावेळी व्यसन न करण्याची शपथदेखील दिली जाते. मंगळवारी बीडमधील या स्तुत्य उपक्रमाचे महिला वर्गातून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आ.विनायक मेटे, नारायण गडाचे महंत हभप शिवाजी महाराज, नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर, प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, समाज कल्याणचे सचिन मडावी, उपजिल्हाधिरी प्रकाश आघाव पाटील, नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे, निवृत्ती महाराज इंदुरीकर, विजयराज बंब, प्रभाकर कोलंगडे, बी.बी.जाधव आदी उपस्थित होते.
आ.विनायक मेटे यांच्या संकल्पनेतून मराठवाडा लोकविकास मंच, मुंबई व कै.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने संगीत रजनीचा कार्यक्रम घेतला जातो. यावेळी ३१ डिसेंबर रोजी अनेकांचा दारू पिण्याकडे कल असतो. त्यादिवशी दूध देऊन नवीन वर्षाचे स्वागत या कार्यक्रमात करण्यात येते. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये मराठी-हिंदी सिनेकलाकारांनी कला सादर केली. यामध्ये अभिनेत्री, मृण्मयी देशपांडे, पल्लवी पाटील, भार्गवी चिरमुले, मयुरेश प्रेम, संसकृती बालगुडे, यांच्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली तर, प्रसन्नजीत कोसंबी, वैशाली माडे यांच्या गीतांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव यांच्या हास्य जत्रेमुळे एकच हशा पिकला होता. या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता सिध्दार्थ चांदेकर याने केले. त्याच्या निवेदनामुळे कार्यक्रमामध्ये उत्साह निर्माण झाला होता.
यावेळी कोणीही व्यसन करु नये, यासाठी व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख व इतरांनी मिळून उपस्थित तरुणांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.
यावेळी आ.विनायक मेटे यांनी तरुणांशी संवाद साधला व व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.