रुग्णालयात उशिरा येणाऱ्या डॉक्टरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत; बीड जिल्हाशल्य चिकित्सकांची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:52 AM2018-11-02T11:52:14+5:302018-11-02T11:55:21+5:30
जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर ड्यूटीच्यावेळेत येत नाहीत. आले तर ओपीडीमध्ये न बसता इतरत्र फिरतात. याबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले होते.
बीड : जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर ड्यूटीच्यावेळेत येत नाहीत. आले तर ओपीडीमध्ये न बसता इतरत्र फिरतात. याबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले होते. याची गंभीर दखल घेत आज सकाळी उशिरा येणाऱ्या डॉक्टरांचे जिल्हाशल्य चिकित्सकांनी गांधीगिरी पद्धतीने स्वागत केले.
जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी उशिरा येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. या वेगळ्या कारवाईमुळे दांडीबहाद्दर व कामचुकार डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे. यावेळी अतिरिक्ति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतीष हरीदास, डॉ.आय.व्ही शिंदे आदींची उपस्थिती होती.
लोकमतने प्रकाशित केलेले वृत्त :