शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 03:28 PM2022-12-23T15:28:28+5:302022-12-23T15:29:15+5:30

२१ वर्षीय तरुणीच्या हाती गावकऱ्यांनी सोपवली विकासाची दोरी 

Well done kid! She fought for village transformation and won, voted for the first time, became Sarpanch | शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली

शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली

googlenewsNext

- नितीन कांबळे
कडा ( बीड) :
गावगाड्याच्या निवडणूका ताब्यात घेण्यासाठी आणि सत्ता आपलीच असावी यासाठी अनेकांनी खुप वर्ष घालावी लागतात. पण गावगाडा चालवणे कठीणच. इथे कोणीच कोणाला मेळ बसु देत नसल्याचे आपण अनेकदा पाहतो. परंतु, पण शिक्षण घेत असतांना गावच्या विकासाठी व परिवर्तन घडवून आणण्यासाठी नारीशक्ती पुढे आली. लढली अन् जिंकून देखील आली. वयाच्या २१ व्या वर्षी हातोळण गावच्या सरपंच पदी विराजमान झालेली भारती बाळु मिसाळ असे सरपंच तरूणीचे नाव आहे. विशेष म्हणजे तिने या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान केले.

आष्टी तालुक्यातील शेवटचे टोक असलेले व अहमदनगर सरहद्दीवर असलेले हातोळण ( औरंगपुर ) हे गाव गावची लोकसंख्खा ११०० तर एकुण मतदान ७१८ पैकि ६८४ झाले. ७ सदस्य संख्या तर ८ वा सरपंच आहे. बाबासाहेब मिसाळ हे छत्रपती क्रांती सेना संघटनेचे अध्यक्ष असून ते परिवर्तनवादी चळवळीचे काम करतात. समाजसेवेच्या माध्यमातून गावचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपल्या मुलीला भारतीला राजकारण सक्रिय केले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत तिला सरपंच पदासाठी उभे केले.

भारती सध्या बारामती येथील शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयात कृषी पदविकेचे शिक्षण घेत आहे. गावच्या विकासासाठी परिवर्तनावादी भुमिका घेऊन ती निवडणूक रिंगणात उतरली आणि बाजी देखील मारली. तिला ३५४ मते मिळाली, २९ मतांनी ती विजयी झाली. अवघ्या २१ व्या वर्षी हातोळण गावची सरपंच होण्याचा मान तिने मिळवला. गावाने तिच्यावर विश्वास टाकला. तेवढ्या ताकतीने हा विश्वास ती पेलवणार देखील असल्याने शाब्बास पोरी मानलं तुला...अशा शब्दांत तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Web Title: Well done kid! She fought for village transformation and won, voted for the first time, became Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.