नीट...शिक्षणतज्ज्ञांच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:38 AM2021-09-15T04:38:41+5:302021-09-15T04:38:41+5:30
देशात प्रत्येक राज्यातील अभ्यासक्रम व अध्यापन पद्धती विभिन्न आहेत. तशीच भौगोलिक परिस्थितीही वेगळी आहे. अशा स्थितीत गुणवत्तेत सर्वच मुले ...
देशात प्रत्येक राज्यातील अभ्यासक्रम व अध्यापन पद्धती विभिन्न आहेत. तशीच भौगोलिक परिस्थितीही वेगळी आहे. अशा स्थितीत गुणवत्तेत सर्वच मुले एकाच परीक्षेसाठी टिकणे अवघड आहे. या परीक्षेच्या भीतीच्या दडपणानेच आत्महत्या मोठ्या प्रमाणात झाल्या. यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी केंद्र सरकारच्या ‘नीट’ च्या माध्यमातून ३० तर सीईटीच्या माध्यमातून ७० टक्के जागा राज्य सरकारला देण्यात याव्यात.
-प्रा.रोहिणी पाठक, शिक्षणतज्ज्ञ.
...
महाराष्ट्र सरकारनेही निर्णय घ्यावा
नीट परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या परीक्षार्थींसाठी वेगळा कोटा निश्चित करावा. जेणेकरून प्रज्ञावंत व हुशार विद्यार्थ्यांचीही गैरसोय होणार नाही. तामिळनाडू राज्याचे अनुकरण इतर राज्यांनीही करायला हवे. कारण कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून महाविद्यालय बंद आहेत. नीट परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे क्लासेसचेही दरवाजे बंद झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेचे निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने विधानसभेत एकमुखी आवाजाने विधेयक संमत करून करायलाच हवा.
-प्रा.संतोष कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ.
...
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
नीट परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात खूपच भीती असते. ही परीक्षा आपण उत्तीर्ण होऊ का?, या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात व खाजगी क्लासेसवाले भरमसाठ फीस घेतात. अनेकदा एवढी मोठी फीस भरणे शक्य होत नसल्यानेच वेगळ्या अभ्यासक्रमाची निवड करावी लागते. अवघड व महागडी शिक्षणपद्धती म्हणजे नीट.
-प्रियांशु शेटे, विद्यार्थी.
...
नीट परीक्षेचा केंद्रीय अभ्यासक्रम अवघड आहे. ही परीक्षा देताना पर्यायी उत्तर देण्यासाठी निर्णय क्षमता महत्त्वाची असते. मात्र, या परीक्षेसाठी असणारा अपुरा वेळ यामुळे प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी वेळच पुरत नाही. विद्यार्थी संभ्रमात जातात. परिणामी नैराश्य वाढते.
-साक्षी पवार, विद्यार्थिनी