बीडमध्ये ओला, सुका कचरा; विल्हेवाटीसाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:23 AM2018-05-29T00:23:13+5:302018-05-29T00:23:13+5:30
कच-यापासून शहराला कायमस्वरुपी मुक्त करण्यासाठी व त्यापासून विविध उपयोगी वस्तू वापरात आणण्याचे प्रयत्न होतआहेत. हाच धागा पकडून उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, छत्तीसगड येथील अंबिकापूर हे गाव स्वच्छतेसाठी मॉडेलमधून पुढे आणणारे प्रवीण नायक यांनी विविध भागांची पाहणी करून आढावा घेतला.
बीड : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानात बीड शहराचा समावेश झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील स्वच्छतेचा आणि ओल्या व सुक्या कच-याचा प्रश्न कायम असून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पावले उचलली जात आहेत. कच-यापासून शहराला कायमस्वरुपी मुक्त करण्यासाठी व त्यापासून विविध उपयोगी वस्तू वापरात आणण्याचे प्रयत्न होतआहेत. हाच धागा पकडून उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, छत्तीसगड येथील अंबिकापूर हे गाव स्वच्छतेसाठी मॉडेलमधून पुढे आणणारे प्रवीण नायक यांनी विविध भागांची पाहणी करून आढावा घेतला.
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी बीड शहराची निवड झालेली आहे. शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नी ओला व सुका कचरा कसा वेगळा करायचा, त्यावर कशा उपाय योजना करायच्या? यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी अंबिकापूर मॉडेलचे प्रवीण नायक, प्रदीप कानवडे हे बीडमध्ये दाखल झालेले आहेत. कचºयापासून समाजोपयोगी वस्तू तयार करणे, सिमेंट प्लॅन्ट तयार करणे, बांधकाम साहित्याची निर्मिती करणे या पार्श्वभूमीवर बीड शहरातील नाळवंडी नाका, जिरेवाडी, समनापूर येथील कचरा टाकलेल्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी काही सूचनाही उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी दिल्या. यावेळी स्वच्छता निरीक्षक विश्वंभर तिडके, भागवत जाधव, सुनील काळकुटे, आर.एस.जोगदंड, भारत चांदण आदी उपस्थित होते.
गांडूळखत निर्मितीच्या प्रकल्पाचे कौतुकच
ओला व सुका कचरा वेगळा करुन त्यापासून गांडूळखत निर्मितीचे प्रकल्प शहरात सुरू केले आहेत. स्वच्छतेचे मॉडेल बनवणारे नायक यांनी धर्मराज जोशी उद्यान येथील गांडूळखत निर्मितीच्या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पालिकेच्या स्वच्छता विभागाचे त्यांनी स्वागत केले. यावेळी हेमंंत क्षीरसागर, डॉ.जावळीकरही उपस्थित होते.