नंबर येईल तेव्हा पुकारतील नाव, तोवर बसा झाडाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:34 AM2021-05-12T04:34:13+5:302021-05-12T04:34:13+5:30
शिरूर कासार : तालुक्यात सोमवारी व मंगळवारी दोन दिवस कोरोना लस प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली जात असल्याने ...
शिरूर कासार : तालुक्यात सोमवारी व मंगळवारी दोन दिवस कोरोना लस प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली जात असल्याने आरोग्य केंद्राला गर्दीने वेढा घातला. अनेकांना सुरक्षित अंतराचे घेणे-देणे नसल्याचे तर काहींनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले. ‘जेव्हा नंबर येईल, तेव्हा नाव पुकारतील. तोपर्यंत बसा झाडाखाली’ अशी सामंजस्याची भूमिकादेखील काहींनी दाखविली.
सोमवारी ४४ वयापर्यंत २०० लस देण्यात आल्या. तर मंगळवारी ४०० ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे काम सुरू होते. लस घेण्यासाठी सकाळपासून नंबर लावला होता. मात्र, गर्दी होत असल्याने सुरक्षित अंतराचे भान ठेवत बाहेर झाडाखाली अनेकांनी ठाण मांडले होते. मात्र, काहींनी बेफिकीरीचे प्रदर्शन घडविले. आरोग्य यंत्रणेकडून गर्दी करू नका, मास्क लावा सुरक्षित अंतर ठेवा अशा सूचना वारंवार दिल्या जात होत्या.
शिरूर शहरातील नागरिकांना जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत लस देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी राम गायकवाड यांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठीच लसीकरण मोहीम सुरू आहे. लस उपलब्ध होतील तशी ती देण्यात येणार आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.
===Photopath===
110521\vijaykumar gadekar_img-20210511-wa0060_14.jpg