बीडमध्ये तूर खरेदी केंद्र कधी सुरू होणार....?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:04 AM2018-01-02T01:04:32+5:302018-01-02T01:04:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : नाफेडच्या वतीने उडीदाची खरेदी झाल्यानंतर आता तूर खरेदी केंद्र कधी सुरु होणार याची शेतकºयांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नाफेडच्या वतीने उडीदाची खरेदी झाल्यानंतर आता तूर खरेदी केंद्र कधी सुरु होणार याची शेतकºयांना प्रतीक्षा लागली आहे. मागील वषीचा अनुभव लक्षात घेत यंदा योग्य ती दक्षता नाफेडसह स्थानिक यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.
बीड जिल्ह्यात कापूस लागवडीकडे शेतकºयांचा वाढता कल आहे. परंतु कधी दुष्काळजन्य स्थिती तर कधी मिळणारा भाव व इतर कारणामुळे तसेच तुरीचे पीक त्या कालवधीत कमी असल्याने तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते. चांगला भाव मिळाल्याने गतवर्षीच्या (२०१६) खरीप हंगामात शेतकºयांनी तुरीचे पीक घेतले. ६२ हजार हेक्टरात तुरीचा पेरा झाला होता. चांगला पाऊस व पोषक वातावरणामुळे तुरीचे बंपर पीक आले. शासनाने हमीभावाने तूर खरेदीसाठी केंद्र सुरु केले. मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी पुरेसे गोदाम तसेच पोत्यांची कमतरता भासत होती. काही वेळा खरेदी बंदमुळे शेतकºयांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. तूर विकताना आलेल्या वाईट अनुभवामुळे बहुतांश शेतकरी कापसाकडे वळले. त्यामुळे २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये तुरीचा पेरा जवळपास ३५ टक्क्यांनी घटला. यंदा चांगला पाऊस असल्यामुळे तुरीचे पीक जोमात आले. हमीभावाने तूर खरेदी कधी सुरु होणार याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
नाफेडतर्फे माहिती घेण्याचे काम सुरु
तूर खरेदी सुरु करण्यासाठी नाफेडमार्फत पीक पेरा व इतर माहिती घेतली जात आहे. हे सोपस्कर पार पडताच खरेदीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. साधारणत: १५ जानेवारीपासून तूर खरेदी सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या तुरीचे पीक शेतकºयांच्या घरात पडून आहे. खरेदी लवकर सुरु झाल्यास आर्थिक आधार होईल असे त्यांना वाटते.