आर्थिक बाजू कमकुवत असताना शासनाच्या योजनेमुळे मिळाली संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:27+5:302021-04-03T04:30:27+5:30

- मीरा लक्ष्मण चव्हाण, पालक ----- शिक्षणाचा हक्क कायद्यामुळे माझ्या मुलीला इंग्रजी शाळेत प्रवेश मिळाला. मी टेलरिंग व्यवसाय करतो. ...

While the economic side was weak, the government's plan provided an opportunity | आर्थिक बाजू कमकुवत असताना शासनाच्या योजनेमुळे मिळाली संधी

आर्थिक बाजू कमकुवत असताना शासनाच्या योजनेमुळे मिळाली संधी

Next

- मीरा लक्ष्मण चव्हाण, पालक

-----

शिक्षणाचा हक्क कायद्यामुळे माझ्या मुलीला इंग्रजी शाळेत प्रवेश मिळाला. मी टेलरिंग व्यवसाय करतो. इंग्रजी शाळेत शिक्षणाचा खर्च आम्हाला पेलला नसता; परंतु आरटीईमुळे मोफत प्रवेश झाला. सवलत मिळाली, याचे समाधान वाटते.

- अशोक जानवळे, पालक

----------

मुलगा हुशार असताना आमची आर्थिक परिस्थिती सदृढ नसल्याने इंग्रजी शाळेत शिकवू शकत नव्हतो; परंतु मागील वर्षी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आरटीईअंतर्गत मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला. त्याच्यासाठी फायदा झाला. शाळा बंद असतानाही ऑनलाइन शिक्षण, उपक्रम घेतले.

-ललीता करकडे, पालक

---------

कोरोनाच्या परिस्थितीतही २३३ शाळांनी आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी नोंदणी केली. २२२१ जागांसाठी पालकांनी ३९५२ अर्ज ऑनलाइन भरले. राज्य स्तरावर लॉटरी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. या लॉटरीतून वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

-अजय बहीर, शिक्षणाधिकारी, बीड.

---------

आरटीईअंतर्गत सोडतीनंतर एसएमएस मिळाल्यानंतर संबंधित पालकांनी त्यांच्या पाल्याचे ऑनलाइन भरलेले सर्व कागदपत्रांची मूळप्रत नेऊन संबंधित शाळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. एसएमएस मिळाले नसल्यास ऑनलाइन खात्री करून घ्यावी.

-ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा जिल्हा समन्वयक आरटीई.

-------

Web Title: While the economic side was weak, the government's plan provided an opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.