अर्ज दाखल करताना उमेदवारासह पाच जणांनाच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:43 PM2019-03-15T23:43:34+5:302019-03-15T23:44:20+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारासह पाच प्रतिनिधींना निवडणूक र्णिय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे.

While filing the nomination, only five people are admitted with the candidate | अर्ज दाखल करताना उमेदवारासह पाच जणांनाच प्रवेश

अर्ज दाखल करताना उमेदवारासह पाच जणांनाच प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी दिली बैठकीत माहिती : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

बीड : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारासह पाच प्रतिनिधींना निवडणूक र्णिय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. सार्वत्रिक निवडणूकीच्या काळात ३९-बीड लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू झाली असून राजकीय पक्षांनी आणि प्रतिनिधींनी त्याच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करतांना उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ५ प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येईल यासाठी सोबत अणावयाची वाहने, तसेच इतरप्रसंगी आचार संहितेनूसार बंधने पाळली जावीत, असे ते म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मतदारसंघात स्टार प्रचारकांच्या प्रचार सभा, प्रचार आदीवेळी कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगितले. सीईओ अमोल येडगे यांनी निवडणूक काळात भरारी, निगराणी पथके कार्यरत असून आचार संहिता भंगाच्या तक्र ारींची तातडीने दखल घेण्यात येईल असे सांगितले.
याप्रसंगी निवडणूकीची तयारी, निवडणूक कार्यक्र माचा दिनांक देऊन प्रचार व प्रसिध्दीसाठी सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रुपीकरणापासून संरक्षण आदींसाठी नियम यांची माहिती देण्यात आली. तसेच आदर्श आचार संहिता मार्गदर्शक तत्वांच्या मराठी व इंग्रजी भाषेतील प्रती देण्यात आल्या. बैठकीसाठी कॉँग्रेस, बहुजन समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस आदी पक्षांचे शेख अफसर, नामदेव चव्हाण, बबनराव गवते, सचिन शेळके, माणिक खांडे, महादेव डोके, विजय पांडूळे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान निवडणूका शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्याबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाकडून शस्त्रास्त्रांबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आदेश असून, त्यानुसार निवडणूका जाहिर झाल्यापासून शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध घालण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Web Title: While filing the nomination, only five people are admitted with the candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.