‘त्या’ शंभर एकर जमीन विक्रीतील मास्टर माईंड कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:34 AM2021-09-11T04:34:15+5:302021-09-11T04:34:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कडा : आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाहची शंभर एकर जमीन बनावट समंती ...

Who is the mastermind behind the sale of 100 acres of land? | ‘त्या’ शंभर एकर जमीन विक्रीतील मास्टर माईंड कोण?

‘त्या’ शंभर एकर जमीन विक्रीतील मास्टर माईंड कोण?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाहची शंभर एकर जमीन बनावट समंती पत्राच्या आधारे बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर येताच सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असले तरी 'त्या' शंभर एकर जमीन विक्री प्रकरणातील मास्टर माईंड कोण? याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

जमीन नावावर करण्यासाठी कोणी रसद पुरवली, महसुलवारीची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर होती? याचा तपास खोलात जाऊन केल्यास अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची चर्चा तालुकाभर आहे. तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाची जमीन दस्तगीर महमंद शेख महंमद बाबा दर्गा या देवस्थानच्या सेवेसाठी खिदमत मास शेख दस्तगीर महंमद यांना प्रदान करण्यात आलेली आहे. शेख कुटुंबीयांकडे ही जमीन वडिलोपार्जित आहे. शेख बाबुलाल, शेख महंमद, शेख हजरत, शेख रशीद, शेख निजाम, शेख दस्तगीर, शेख गुलाब असे मिळून जमिनीची देखभाल करीत होते. पण २०२०मध्ये या जमिनीची परस्पर खरेदी झाल्याचे त्यांना समजले. याचा त्यांनी पाठपुरावा केला. यात खोटे दस्तऐवज निदर्शनास येताच आष्टी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात तीन प्राध्यापक, एक मुख्याध्यापक, एक विद्यमान सरपंच व अन्य एकाचा समावेश आहे. असे असले तरी या प्रकरणातील जमीन परस्पर खरेदी करण्यासाठी रसद कोणी पुरवली? महसूल दरबारी कोणी चकरा मारल्या? कोणत्या अधिकाऱ्याला हाताशी धरले? याचा मास्टर माईंड कोण? हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दस्तगीर महंमद शेख यांनी आष्टी ठाण्यात ३ सप्टेंबर रोजी तक्रार दिली. त्यावरून प्रा. आजिनाथ त्र्यंबक बोडखे, मुख्याध्यापक सुरेश गहिनीनाथ बोडखे, प्रा. गोपीनाथ पांडुरंग बोडखे, (सर्व रा. आनंदवाडी), प्रा. शेख मुस्ताक बादशाह पानसरे, सरपंच संजय भाऊसाहेब नालकोल, शरद नानाभाऊ पवार यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

..

आणखी एका आरोपीस अटक

प्रा. गोपीनाथ बोडखे, प्रा. आजिनाथ बोडखे, सरपंच संजय नालकोल, शरद पवार यांना अटक केली असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. अन्य एक आरोपी मुख्याध्यापक सुरेश गहिनीनाथ बोडखे यालादेखील बुधवारी अटक करण्यात आली आहे.

...

Web Title: Who is the mastermind behind the sale of 100 acres of land?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.