मध्यरात्रीनंतर शहरातील रस्त्यावर फिरतात तरी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:37 AM2021-09-23T04:37:57+5:302021-09-23T04:37:57+5:30
रिॲलिटी चेक बीड : जिल्ह्यात रात्री-अपरात्री नागरिक घरात डाराडूर झोपलेले असताना पोलीस मात्र रस्त्यावर सुरक्षेसाठी जागता पहारा देतात. संशयितांसह ...
रिॲलिटी चेक
बीड : जिल्ह्यात रात्री-अपरात्री नागरिक घरात डाराडूर झोपलेले असताना पोलीस मात्र रस्त्यावर सुरक्षेसाठी जागता पहारा देतात. संशयितांसह चोरट्यांवर पोलिसांची भिरभिरती नजर असते. मध्यरात्रीनंतर शहरांतील रस्त्यांवर रिकामटेकडेच अधिक असतात, असे २२ सप्टेेंबर रोजी रात्री गस्तीदरम्यान आढळून आले.
रस्त्यावर हेडलाईट लावून उभी असलेली वाहने, बेवारस वाहनांची पोलिसांकडून तपासणी होते. तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीलाही पोलीस धावून जातात.
....
रिकामटेकड्यांची संख्या जास्त
वडवणी : १२:००
बीड-परळी राज्य मार्गावरील वडवणी येथील मुख्य चौकात चार ते पाच तरुण उभे होते. त्यांना जिल्हा गस्तीवरील अधिकारी व अंमलदारांनी हटकल्यावर मित्रांची वाट पाहत थांबलो असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी हटकल्यावर सगळेच पांगले.
...
दिंद्रूड : ०१:३०
दिंद्रूड येथे ओळीने हॉटेल आहेत. त्याबाहेर काही लोक उभे होते. पोलिसांनी कशासाठी थांबलात, असा प्रश्न केल्यावर काही नाही... घरीच निघालो आहोत... असे उत्तर मिळाले. त्यानंतर काही वेळातच लोक तेथून निघून गेले. गावातील अंतर्गत रस्त्यावर शुकशुकाट होता.
....
माजलगाव: ०२:३०
येथे मुख्य रस्ता सामसूम होता. तुरळक प्रमाणात वाहनांची रेलचेल होती. बसस्थानकापुढे काही जण उभे होते. पोलिसांनी त्यांना हटकल्यावर त्यांनी काही क्षणात तेथून काढता पाय घेतला. गढी (ता. गेवराई) फाट्यावर काही लोक वाहनाच्या प्रतीक्षेत उभे होते.
....
जिल्ह्यात रात्रीची गस्त
चारचाकी वाहने ३५
दुचाकी वाहने १०
पोलीस : २००
......
गस्तीवरील वाहनांना जीपीएस लावलेले आहेत. त्याद्वारे गस्तीदरम्यान कोणते वाहन कोठे होते, याची पडताळणी केली जाते. जिल्हाभरात संवदेनशील १५०० ठिकाणे निश्चित केली आहेत. तेथे सुबाहू ॲपद्वारे गस्तीदरम्यान विशेष लक्ष ठेवले जाईल.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड.
....
पोलिसांची गस्त म्हणून आपली झोप मस्त
१) पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच जिल्हा गस्त अशा पद्धतीने रात्रभर सुरक्षेचे नियोजन केलेले असते. यासोबतच आवश्यक तेथे नियंत्रण कक्षातून राखीव कुमक पाठवली जाते.
२) गस्तीदरम्यान संशयास्पद वाहने, संशयित नागरिक, विनाकारण रस्त्यांवर भटकणाऱ्यांची पोलिसांकडून विचारपूस केली जाते. त्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसून संभाव्य गुन्हे टळण्यास मदत होते.
.....
220921\22bed_9_22092021_14.jpg
बीड शहर ४:००