साखर, तेलाऐवजी किराणा दुकानातून गुटख्याची 'होलसेल' विक्री
By सोमनाथ खताळ | Published: September 30, 2022 03:07 PM2022-09-30T15:07:08+5:302022-09-30T15:07:27+5:30
शहरातील बशिरगंज भागातील क्लासीक ट्रेडर्स नावाच्या होलसेल किराणा दुकानावर प्रशासनाचा छापा
बीड : किराणा दुकानातून चहा पत्ती, साखर, तेल अशी पदार्थ विक्री केली जातात. परंतू गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळताच अन्न प्रशासनाने धाड टाकत तब्बल ५० हजार रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी सकाळी बशिरगंज भागात केली.
शहरातील बशिरगंज भागात क्लासीक ट्रेडर्स नावाचे होलसेल किराणा दुकान आहे. याच दुकानात गुटख्याचा साठा असल्याची माहिती अन्न प्रशासनाला मिळाली. त्यांनी तात्काळ सापळा रचून शुक्रवारी सकाळीच धाड टाकली. यावेळी प्रशासनाला पोत्यांमध्ये गुटखा साठवून ठेवल्याचे दिसले. हा सर्व गुटखा जप्त केला आहे. जवळपास ५० हजार रूपयांचा हा गुटखा असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला जाणार आाहे. ही कारवाई सहायक आयुक्त इम्रान हाश्मी, अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केली.