अधिकृत पत्रावर भूमिका जाहीर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:55+5:302021-05-28T04:24:55+5:30
मराठा क्रांती मोर्चाची बैठक : पदाधिकाऱ्यांचा निर्णय बीड : अनेक पक्षांचे नेते किंवा अन्य काहीजण आपली भूमिका मांडत असताना ...
मराठा क्रांती मोर्चाची बैठक : पदाधिकाऱ्यांचा निर्णय
बीड : अनेक पक्षांचे नेते किंवा अन्य काहीजण आपली भूमिका मांडत असताना मराठा क्रांती मोर्चाची भूमिका असल्याचे सांगताना दिसून येत आहेत. मात्र, त्यांचा या संघटनेशी संबंध नसणार आहे. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा आपली भूमिका वेळोवेळी अधिकृत पत्राद्वारे समाजासमोर जाहीर करेल, असा निर्णय क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आला असून, यासंदर्भात बीड येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
मराठा क्रांती मोर्चा मागील पाच वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मराठा समाजाचे इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध पद्धतीने लढा देत आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून समाजातील काही मंडळी आपली भूमिका ही मराठा क्रांती मोर्चाची भूमिका असल्याचे भासवत सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपले मत प्रकाशित करीत आहेत. असे असले तरीही अशा व्यक्तींचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही संबंध नाही. मराठा क्रांती मोर्चाने आजवर जी भूमिका मांडली ती मराठा क्रांती मोर्चाच्या अधिकृत पत्रावर मांडलेली आहे. असा निर्णय २६ मे रोजी बीड येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच मराठा समाजाच्या आरक्षण व इतर सामाजिक प्रश्नांसंदर्भात संघटना, राजकीय पक्ष लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असतील, तर त्या आंदोलनांना मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा राहील. यावेळी बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲड. मंगेश पोकळे, बी. बी. जाधव, प्रा. राजेश भुसारी, डॉ. प्रमोद शिंदे, भास्कर गायकवाड आणि अजित वरपे यांची उपस्थिती होती.
===Photopath===
260521\321726_2_bed_20_26052021_14.jpeg
===Caption===
मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी