पेन्शनरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार -भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:10 AM2019-12-18T01:10:36+5:302019-12-18T01:10:53+5:30

पेन्शनरांसाठी तत्पर सेवा देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे प्रतिपादन एसबीआयचे क्षेत्रीय प्रबंधक नंदकुमार भोसले यांनी केले.

 Will be committed to solving pensioners' problems | पेन्शनरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार -भोसले

पेन्शनरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार -भोसले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सेवानिवृतांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा मी माझ्या सेवाकाळात सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहे. पेन्शनरांसाठी कोकणात असताना सकाळी आठ वाजेपासून बँकेमध्ये व्यवस्था केली होती. बीड येथेही अशी तत्पर सेवा देण्यासाठी आपण कटिबध्द राहणार असल्याचे प्रतिपादन एसबीआयचे क्षेत्रीय प्रबंधक नंदकुमार भोसले यांनी केले.
येथील राजुरी वेस भागातील एसबीआयच्या प्रांगणात एसबीआय आणि पेन्शनर्स अ‍ॅन्ड सिनियर सिटीजन्स असोसिएशनच्या वतीने मंगळवारी पेन्शनर्स डे कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा कोषागार अधिकारी दि. र. झिरपे, एसबीआय राजुरीवेस शाखेचे मुख्य प्रबंधक महेश चौधरी, उपकोषागार अधिकारी घोळवे, माने, मराठवाडा कार्याध्यक्ष भास्करराव सरदेशमुख यांच्यासह पेन्शनर्स संघटनेचे पदाधिकारी, आयुषचे डॉ. लिमकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी झिरपे म्हणाले, संघटनेमुळे सेवानिवृत्तांचे जवळजवळ सर्व प्रश्न सुटलेले आहेत. एक तारखेलाच निवृत्ती वेतन देण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातील सर्व प्रकरणे निकाली काढले आहेत. यापुढेही कोषागार कार्यालयाकडून अडवणूक होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्य प्रबंधक महेश चौधरी म्हणाले,इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित सेवानिवृत्तांशी सुसंवाद साधण्याचा आलेला हा अनुभव माझ्या आयुष्यात महत्त्वाचा असून पेन्शनरांची सेवा करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. पेन्शनर्स डे कार्यक्रम आयोजनाची परंपरा कायम ठेवणार असून सेवानिवृत्तांनी अडचणी असतील तर वैयिक्तक संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद स्तरावरील वृत्तांची प्रकरणे पेन्शन अदालतच्या माध्यमातून निकाली काढली जातात असे जिल्हा परिषदेतील पेन्शन विभागाचे राहुल येनकुळे यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागाचे डॉ. लिमकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक पेन्शनर्स अ‍ॅन्ड सिनियर सिटीझन्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पी. ए. गोरकर यांनी केले तर सचिव डी. जे. देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी रवींद्र केंद्रे, पी. व्ही. कुलकर्णी, श्रीराम कुलकर्णी, सुधाकर सर्वज्ञ, पद्माकरराव रत्नपारखी, प्रा. आशा पोहेकर, प्रेमचंद वैष्णव, माजी सैनिक त्र्यंबक जोशी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. मुख्य कार्यक्रमानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या सेवानिवृत्तांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
या कार्यक्र मात सेवानिवृत्तांसाठीच्या नोंद दर्शिकेचे विमोचन करण्यात आले. संघटनेचे सदस्य पद्माकर रत्नपारखी आणि सचिव दुर्गादास देशपांडे यांनीही नोंद दर्शिका संपादित केली आहे.
निवृत्त प्रमुख जिल्हा न्या. प्राची कुलकर्णी यांची या पुस्तिकेला प्रस्तावना असून कुटुंब निवृत्ती वेतनासह इतर बाबींच्या नोंदीसाठी ही पुस्तिका उपयोगी ठरणार असल्याचे मत अनेक सेवानिवृत्तांनी व्यक्त केले.
‘होल्ड’ खात्याबाबत दक्षता घेणार
पेन्शनरांच्या होल्ड खाते प्रकरणात आरबीआयचे आदेश आणि पेन्शनरांचे नियम याबाबत कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करून पेन्शनरांचे खाते होल्ड होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
तसेच एटीएम हे सेवानिवृत्तांनी स्वत: वापरावे त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन एसबीआयजे क्षेत्रीय महाप्रबंधक
नंदकुमार भोसले म्हणाले.

Web Title:  Will be committed to solving pensioners' problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.