माणसं मेल्यावर आरोग्य केंद्रात औषधी येणार का? औषधांचा प्रचंड तुटवडा, संतापजनक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 06:02 AM2023-03-16T06:02:49+5:302023-03-16T06:03:18+5:30

‘लोकमत’ने औषधांच्या तुटवड्याबाबत वारंवार वास्तव मांडलेले आहे.

will medicine come to the health center when people died massive shortage of medicines | माणसं मेल्यावर आरोग्य केंद्रात औषधी येणार का? औषधांचा प्रचंड तुटवडा, संतापजनक चित्र

माणसं मेल्यावर आरोग्य केंद्रात औषधी येणार का? औषधांचा प्रचंड तुटवडा, संतापजनक चित्र

googlenewsNext

>> सोमनाथ खताळ

बीड : ग्रामीण आरोग्य यंत्रणा सध्या औषधांविना आजारी पडली आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. सध्या तर लहान मुलांचे कसलेच औषधी उपलब्ध नाहीत. खोकल्याची एकही बॉटल नाही. जिल्हा नियोजन समितीने चार कोटींचा निधीही दिला; परंतु अद्यापही खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यासाठी आरोग्य विभाग काय मुहूर्त पाहतेय का? तसेच एखादा बळी गेल्यावर औषधी येणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तसेच २९७ उपकेंद्र आहेत. अपवादात्मक वगळता सर्वच आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे; परंतु मागील पाच ते सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील कोणत्याच आरोग्य केंद्र व उपकेंद्रात औषधी नाहीत. जिल्हा नियोजन समितीने ४ कोटी रुपयांचा निधी औषधांसाठी दिला. याची प्रक्रिया साधारण आठ महिन्यांपूर्वी झाली होती; परंतु मुंबईचा नियोजन विभाग व स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने अद्यापही याबाबत काहीच कारवाई झालेली नाही. आरोग्य विभागाकडून केवळ तांत्रिक अडचणी असल्याचे कारण सांगत हात झटकले जात आहेत; परंतु याचा फटका सामान्य रुग्णांना सहन करावा लागत आहे. औषधांविना एखादा बळी गेल्यावर आरोग्य विभाग, प्रशासन आणि शासन औषधी खरेदी करणार आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. औषधी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या औषधींचा तुटवडा

खोकल्याची एकही बॉटल नाही, सर्दी, ताप, खोकला आदींची एकही गोळी नाही. कुत्र्याची लस, ॲसिडीटीची गोळी, तसेच लहान लेकरांसाठी आवश्यक असणारी औषधे व गोळ्या नाहीत. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियासाठी आवश्यक असणारे प्रोमीथीयाझीन, पेन्टाझीशीन हे इंजेक्शनही नाही. तसेच जखम झाली तर पट्टी करण्यासाठी ड्रेसिंग मटेरियलपण नाही.

‘लोकमत’ने मांडले वास्तव

‘लोकमत’ने औषधांच्या तुटवड्याबाबत वारंवार वास्तव मांडलेले आहे. औषधी नसल्याने सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. सरकारी रुग्णालयात केवळ तपासणी केली जात असून, औषधी मात्र खासगी मेडिकलवरून खरेदी करावे लागत आहेत. याचा आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागत आहे. तसेच जखम झाली तर रक्त पुसायला साधा बोळाही नाही, हेदेखील मांडले होते. त्यानंतर प्रशासनाने खडबडून जागे होत तांत्रिक अडचणी दूर करून ४ कोटींचा निधी आरोग्याकडे वितरित केला होता; परंतु आता आरोग्य विभाग खरेदीसाठी कशाचा मुहूर्त पाहत आहे ? याबाबत प्रश्न आहे.
...

उपकेंद्र २ व आरोग्य केंद्र २ असा चार कोटींचा निधी आहे, हे खरे आहे. खरेदीबाबत जीईएम पोर्टलवर निविदा झाली आहे. पुरवठा आदेश देऊन पंधरवड्यात सर्व औषधी उपलब्ध होतील. सध्या रुग्णकल्याणमधून तात्पुरती सोय केली जात आहे.
- डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड

Web Title: will medicine come to the health center when people died massive shortage of medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.