माझा जीव गेल्यावर आरोपींना पोलीस पकडणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:37 AM2021-09-05T04:37:50+5:302021-09-05T04:37:50+5:30
३० मे रोजी हनुमंत जगताप यांच्यावर हल्ला करून पुलावरून फेकण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर जगताप यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात ...
३० मे रोजी हनुमंत जगताप यांच्यावर हल्ला करून पुलावरून फेकण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर जगताप यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अमोल शिवाजी शिंदे, राजेंद्र नारायण शिंदे, योगेश मच्छिंद्र शिंदे, नितीन शेवा जाधव आणि नंदू अंकुश कुटे यांच्याविरोधात तक्रार दिली. या घटनेला पाच दिवस उलटूनही यातील एकालाही पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. तर पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतलेले दत्ता जाधव व ईश्वर देवकर (दोघे रा. पेठ बीड) या दोघांना आपण ओळखत नसल्याचे जगताप यांनी सांगितले. हा प्रकार गंभीर असतानाही पोलीस आरोपींना अटक करत नसून माझा जीव गेल्यावर पकडणार का, असा सवाल उपस्थित करत माझ्या जिवाचे बरे-वाईट झाल्यास याला तक्रारीतील आरोपी व पोलीसच जबाबदार राहतील, असेही जगताप यांनी म्हटले आहे.
आरोपींकडून आम्हाला धोका - उर्मिला जगताप
माझ्या पतीवर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी अद्यापही पोलिसांना पकडता आलेले नाहीत. माझे पती रुग्णालयात दाखल असून त्या हल्लेखोर आरोपींकडून माझ्या संपूर्ण परिवारालाच धोका असून पोलीस प्रशासनाने तात्काळ आरोपींना अटक करावी, अशी मागणी हनुमंत जगताप यांच्या पत्नी उर्मिला यांनी केली आहे.