भाजपाच्या दोन संचालकांचे राजीनामे मंजूर होणार की दबावनाट्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:34 AM2021-04-17T04:34:14+5:302021-04-17T04:34:14+5:30

धारूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाच्या सत्ताधारी दोन संचालकांनी राजीनामे सचिवाकडे सुपुर्द केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...

Will the resignations of two BJP directors be accepted or a pressure play? | भाजपाच्या दोन संचालकांचे राजीनामे मंजूर होणार की दबावनाट्य?

भाजपाच्या दोन संचालकांचे राजीनामे मंजूर होणार की दबावनाट्य?

Next

धारूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाच्या सत्ताधारी दोन संचालकांनी राजीनामे सचिवाकडे सुपुर्द केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सभापती आणि उपसभापती हे विश्वासात घेत नसल्यामुळे आम्ही राजीनामे देत असल्याचे संबंधित दोन सदस्यांनी सांगितले. हे राजीनामे दबावनाट्य ठरणार की मंजूर होणार याबाबत जोरदार चर्चा होत आहे.

बाजार समिती स्थानिक निधीतून होणाऱ्या कामावरून हे राजीनामा दबाब तंत्र सुरू असल्याचे समजते. धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण १८ संचालक आहेत. यामध्ये भाजपाचे ११ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ७ सदस्य आहे . भाजपच्या संचालकाचे बहुमत असल्यामुळे ही कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपाच्या ताब्यात आहे. सध्या बाजार समितीमध्ये कार्यरत असलेले संचालक सचिन मैंद व ॲड. नवनाथ पांचाळ या दोघांनी गुरुवारी बाजार समितीचे सचिव दत्ता सोळंके यांच्याकडे राजीनामे सुपुर्द करण्यात आले आहेत. या दोघांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपच्या गोटामध्ये एकच खळबळ उडाली असून राजीनामे मागे घेण्यासाठी अन्य पदाधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू आहेत.

नेमके राजीनाम्याचे कारण मात्र स्पष्ट समजून शकले नाही. मात्र आम्हाला पदाधिकारी विश्‍वासात घेत नसल्यामुळे आम्ही राजीनामा दिल्याचे सचिन मैंद यांनी सांगितले. सध्या गोदामाचे काम सुरू असून आम्हाला काहीच कल्पना दिलेली नाही, असे ॲड नवनाथ पंचाळ यांनी सांगितले. तर दोन संचालकांनी राजीनामे दिले असून ते अद्याप मंजूर केले नसल्याचे सचिव दत्ता सोळंके यांनी सांगितले. मात्र हे राजीनामे सत्ताधारी गटातील मतभेद व बाजार समिती स्थानिक निधीमधून बांधकाम होत असलेल्या गोदाम बांधकामावरून दबाब तंत्रासाठी असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी याबाबत चर्चेसाठी सत्ताधारी गटात गुप्त बैठक होणार असल्याचे समजते.

===Photopath===

160421\img-20210416-wa0133_14.jpg

Web Title: Will the resignations of two BJP directors be accepted or a pressure play?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.