शेतमजुरांच्या हातातील कोयता सोडवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 11:31 PM2019-10-08T23:31:46+5:302019-10-08T23:33:00+5:30
येत्या पाच वर्षात ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता काढून त्यांना स्वावलंबी बनवू, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी लाखो जनसमुदास दिला आणि गगनभेदी टाळ्यांनी आसमंत निनादला.
अनिल गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भगवान भक्तीगड, सावरगावघाट : येत्या पाच वर्षात ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता काढून त्यांना स्वावलंबी बनवू, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी लाखो जनसमुदास दिला आणि गगनभेदी टाळ्यांनी आसमंत निनादला.
मंगळवारी पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील श्री क्षेत्र भगवान भक्ती गड दसरा मेळाव्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पंकजा मुंडे, डॉ. खा. प्रीतम मुंडे यांच्या विनंतीवरून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे ,खा.प्रीतम मुंडे खासदार सुजय विखे पाटील, ओमराजे निंबाळकर, यशश्री मुंडे, जयदत्त क्षीरसागर, भूपेंद्र यादव, अतुल सावे, हरिभाऊ बागडे, टी.पी. मुंडे, आदिसह मान्यवर उपस्थित होते तर दुसऱ्या व्यासपीठावर राज्यभरातील मंत्री, खासदार आमदार उपस्थित होते.
हेलिकॉप्टरने प्रथम मंदिराला प्रदक्षिणा घातली. संत भगवान बाबा मूर्तीचे अमित शहा यांनी पूजन केले. यावेळी बाबांची आरती गाण्यात आली. व्यासपीठावर आगमन होताच त्यांचे संत भगवान बाबांची मूर्ती व ज्ञानेश्वरी आणि फेटा बांधून शहा व सर्वांचे स्वागत करण्यात आले. शहा पुढे म्हणाले की, आज दसºयाच्या शुभदिवशी संत भगवान बाबांच्या विशाल प्रतिमेचे पूजन केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, भगवान बाबांच्या आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे समाजाला चांगले दिवस आणण्याचे स्वप्न होते. यासाठी मी प्रयत्न करणार असून येत्या पाच वर्षात कामगारांच्या हातातील कोयता काढून स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न असेल. नरेंद्र मोदी, अमित शहांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्व लोकनेते गोपीनाथ मुंडे, भगवान बाबांच्या कृपाशीर्वादाने गोरगरीब दीनदलित, दुबळा, वंचित, शोषित, घटकांना प्रवाहात आणण्यासाठी जिवाचे रान करणार असल्याचे त्या म्हणाल्या. चार वर्षांपूर्वी हिरकणी बनवून अहंकाराच्या गडावरून खाली उतरले; इथे लाखोंच्या संख्येने जमून तुम्ही मला पाठबळ देत आहात ... तुमचा सन्मान आणि स्वाभिमान मी टिकवणार असून, स्व.मुंडें चे नाव तुमच्या हृदयातील जपण्यासाठी आपण शेवटपर्यंत एक राहू ...असे सांगून त्यांनी तमाम जनसमुदायाला दसºयाच्या शुभेच्छा दिल्या...!
प्रास्ताविक खा प्रीतम मुंडे यांनी केले. या मेळाव्याला हरिभाऊ बागडे, अतुल सावे, जयदत्त क्षीरसागर, महादेव जानकर, गोविंद केंद्रे, ह.भ.प. पानेगावकर, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, नारायण कुचे, मोनिका राजळे, आ.सुरेश धस शशिकांत खेडकर ,मोहन जगताप, सुजित सिंह ठाकूर, शीतल सानप, तोताराम कायंदे, बबनराव पाचपुते, मनोहर धोंडे, आर टी देशमुख, ओमराजे निंबाळकर, बाळासाहेब दोडतले आदीसह राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.
संत भगवान बाबांच्या कार्याची प्रचिती
संत भगवान बाबांनी जीवनभर शेतकरी व मजुरांना शिक्षणाचा मार्ग दाखवला अंधश्रद्धा दूर केली. या महात्म्याच्या अलौकिक शक्तीची आज अक्षरश: प्रचिती आली, अशी प्रतिक्रि या अभ्यासक प्रा. बिभिषण चाटे यांनी व्यक्त केली.
देशभरातील भाविकांचा ओघ
देशातील विविध राज्यातील भगवान बाबांचे भक्त बाबांच्या आशीर्वादासाठी चरणी होऊन धन्य होण्यासाठी कालपासूनच येत राहिले... हरियाणा, तेलंगणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आधीसह देशभरातून आलेल्या भक्तांनी आशीर्वाद घेतला.