मताधिक्याची परंपरा यावेळीही राहील कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:27 AM2019-04-07T00:27:54+5:302019-04-07T00:28:40+5:30

सतीश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड लोकसभा मतदार संघाच्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीवर दृष्टीक्षेप टाकला असता ...

Will the tradition of voting continue? | मताधिक्याची परंपरा यावेळीही राहील कायम?

मताधिक्याची परंपरा यावेळीही राहील कायम?

Next
ठळक मुद्देबीड लोकसभा मतदार संघ निवडणूक २००९। २०१४ : गोपीनाथरावांना सर्वच विधानसभा मतदारसंघांनी दिली होती आघाडी

सतीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड लोकसभा मतदार संघाच्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीवर दृष्टीक्षेप टाकला असता दोन्हीही वेळेस सहाच्या सहा विधानसभा मतदार संघाने भाजपाचे उमेदवार गोपीनाथराव मुंडे यांना मताधिक्य दिले आहे. २०१४ पोटनिवडणुकीत तर भाजपाच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी जवळपास सात लाखांच्या विक्रमी मताधिक्याने काँगे्रसचे अशोकराव पाटील यांचा पराभव केला होता.
१९९६ पासून २०१४ च्या पोटनिवडणुकीसह सात लोकसभेसाठी निवडणुका झाल्या. २००४ चा अपवाद वगळला तर सहा निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. यावरून बीड मतदार संघावर भाजपाचा दबदबा दिसून येतो.
शक्यतो ज्या विधानसभा मतदार संघातील उमेदवार असतो, सहसा त्या विधानसभा मतदार संघात त्या उमेदवारास इतर मतदार संघांच्या तुलनेत थोडी मते अधिक पडतात. २००९ मध्ये परळीने गोपीनाथरावांना ४३,७४८ मतांची आघाडी दिली होती परंतु, मोदी लाट असतानाही २०१४ मध्ये हे मताधिक्य २५ हजारांपर्यंत घसरले होते. कारण सख्खा पुतण्या धनंजय मुंडे हे त्यांच्याविरोधात राष्टÑवादी काँग्रेससोबत होते.
याउलट २००९ मध्ये राकाँचे रमेश आडसकर यांना केज मतदार संघात मताधिक्य मिळाले नसले तरी मुंडेंना त्यांनी रोखले होते. केजमध्ये मुंडेंना साडेनऊ हजारच मताधिक्य मिळाले. त्याचप्रमाणे २०१४ मध्ये राकाँचे सुरेश धस यांनाही त्यांच्या आष्टी मतदार संघात आघाडी मिळाली नसली तरी त्यांनी मुंडेना रोखले होते. २००९ मध्ये आष्टीने मुंडेंना ३९ हजारांचे मताधिक्य होते ते १४ मध्ये ८ हजारांवर आले होते. याउलट मुंडेंनी २०१४ मध्ये केज मतदार संघात आपले मताधिक्य ३२ हजारांपर्यंत वाढविले होते.
आता राकाँचे बजरंग सोनवणे हे केज मतदार संघात किती मते घेतात याबद्दल उत्सुकता आहे कारण यावेळी रमेश आडसकर, आ.सुरेश धस हे त्यावेळेसचे राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार आता भाजपात असून डॉ. प्रीतम मुंडे यांची प्रचार यंत्रणा राबवित आहेत.
चित्र बदलेल का? कसे?
२००९ मध्ये भाजपासोबत माजी आ. अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे तर राकाँकडून माजी आ. प्रकाश सोळंके, आ.सुरेश धस, आ.धोंडे, आ.क्षीरसागर होते.
२०१४ भाजपासोबत आ.भीमराव धोंडे तर राकाँकडून आ.अमरसिंह पंडित, आ. सुरेश धस, क्षीरसागर, धनंजय मुंडे, सोळंके असे मातब्बर होते.
२०१९ मध्ये अमरसिंह, सोळंके, धनंजय तर भाजपाकडून धस, धोंडे, क्षीरसागर, बदामराव, भाजपाचे आमदार आहेत.

Web Title: Will the tradition of voting continue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.