शेतात काम करणाऱ्या महिलेचा तुटलेल्या विद्युत तारेने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 19:27 IST2021-10-08T19:25:17+5:302021-10-08T19:27:17+5:30
गवत कापण्यात गुंग झालेल्या महिलेचा स्पर्श लोंबकळत असलेल्या विद्युत तारेला झाला

शेतात काम करणाऱ्या महिलेचा तुटलेल्या विद्युत तारेने घेतला बळी
अंबाजोगाई : तालुक्यातील जवळगाव येथे शेतात काम करत असलेल्या वृद्ध महिलेचा तुटलेल्या विजेच्या तारेला चिटकून विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.०८) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
सुक्षलाबाई विश्वनाथ हारे (वय ५८, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. सुक्षलाबाई शुक्रवारी दुपारी शेतातील बांधाच्या कडेने गवत कापत होत्या. जवळच ११ केव्ही विद्युत लाईनची तार तुटून पडलेली होती. गवत कापण्यात गुंग झालेल्या सुक्षलाबाईंचा स्पर्श या लोंबकळत असलेल्या विद्युत तारेला झाला आणि विजेच्या जोरदार धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. महावितरणच्या हलगर्जीपानामुळेच सदर महिलेचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हेही वाचा :
- शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले; आधी पिके गेली आता वीज कोसळून १५ जनावरे दगावली
- भावासोबत गुरे चारण्यास गेलेल्या मुलीचा तलावात बुडून मृत्यू