निरोगी आरोग्यासाठी महिलांनी दररोज योगा करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:22 AM2021-06-23T04:22:12+5:302021-06-23T04:22:12+5:30
आष्टी : निरोगी आरोग्यासाठी केवळ आंतरराष्ट्रीय योग दिनापुरते योगासने न करता महिलांनी दररोज सकाळी नियमित योगा करणे काळाची ...
आष्टी : निरोगी आरोग्यासाठी केवळ आंतरराष्ट्रीय योग दिनापुरते योगासने न करता महिलांनी दररोज सकाळी नियमित योगा करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन योगशिक्षिका सविता बाळासाहेब ढवळे यांनी केले.
येथील अनिल भैय्यानगरमध्ये लेडीज हेल्थ क्लबच्या वतीने सोमवारी जागतिक योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिलांनी आपल्या कुटुंबातील जबाबदारी सांभाळत असताना आपले आरोग्यदेखील निरोगी राहावे यासाठी दररोज घरी राहून योग प्राणायाम करणे आवश्यक आहे. याद्वारे आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे आवाहन सविता ढवळे यांनी केले आहे. या कार्यक्रमास मंजूश्री राजाभाऊ कदम, सुलभा किशोर हंबर्डे, प्रज्ञा रत्नदीप निकाळजे, सुमित्रा काळे, स्वाती चौधरी, योगिता पोकळे, विमल निकाळजे, मंदाकिनी कांबळे, जनाबाई बनसोडे, सुनीता सोनवणे, सुमन गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या.
===Photopath===
210621\2638img-20210621-wa0179_14.jpg