'वेगळा विचार,अनोखा सन्मान'; महिला डॉक्टरांना केले एक दिवसाचे जिल्हा आरोग्य अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 12:34 PM2022-03-08T12:34:58+5:302022-03-08T12:38:06+5:30

Women's Day Special: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांनी केलेल्या सन्मानामुळे अधिकारी, कर्मचारीही भारावून गेले होते.

Women's Day Special: 'Different Thoughts, Unique Respect for Women'; female doctors works as District Health Officer for one day | 'वेगळा विचार,अनोखा सन्मान'; महिला डॉक्टरांना केले एक दिवसाचे जिल्हा आरोग्य अधिकारी

'वेगळा विचार,अनोखा सन्मान'; महिला डॉक्टरांना केले एक दिवसाचे जिल्हा आरोग्य अधिकारी

Next

बीड : महिला दिनाचे ( World Women's Day) औचित्य साधून तीन महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा कारभार देण्यात आला. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांनी वेगळा विचार करत मनाचा मोठेपणा दाखवित महिला सहकाऱ्यांचा अनोखा सन्मान केल्याने स्वागत होत आहे. 

महिला दिनाच्या निमित्ताने सर्वच पाटोदा तालुक्यातील वाहली आरोग्य केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.चैताली भोंडवे, बीड तालुक्यातील नाळवंडीच्या प्रभारी डॉ.प्रज्ञा तरकसे व केज तालुक्यातील वीडा येथील डॉ.शितल कांबळे या तीन महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले. तेथे त्यांना सन्मान करून काही वेळासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली. तसेच कार्यालयातील इतर महिला कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांनी केलेल्या सन्मानामुळे अधिकारी, कर्मचारीही भारावून गेले होते.

सन्मान करण्याची संधी मिळाली 
पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. त्यांचा आदर वर्षभर केला जातो. परंतू महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळतेय, हे भाग्यच आहे. आमच्या सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
- डॉ.अमोल गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड

Web Title: Women's Day Special: 'Different Thoughts, Unique Respect for Women'; female doctors works as District Health Officer for one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.