लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:42 AM2019-06-21T00:42:24+5:302019-06-21T00:42:48+5:30
वनविभागाच्या पथकाने लाकडाची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रक पकडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : वनविभागाच्या पथकाने लाकडाची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रक पकडला. ही कारवाई गुरूवारी दुपारी राजुरी ते शिरूर रस्त्यावर करण्यात आली. लाकडासह ट्रक जप्त केला असून, त्याची एकत्रित किंमत सुमारे ४ लाख १० हजार रुपये आहे.
मानूरकडून बीडकडे ट्रकमधून अवैधरीत्या लाकडाची वाहतूक सुरू करण्यात येत होती. मात्र, वन विभागाचे फिरते पथक नेमके याच रस्त्यावर गस्त घालत होते. अचानकपणे त्यांना लाकडाची वाहतूक करणारा ट्रक (क्र.एमएच ०४ बीयू २८६६) दिसला. ट्रकची तपासणी केली असता, त्यात आंबा जातीच्या झाडाचे लाकूड आढळून आले. चालकाजवळ लाकूड वाहतुकीची कागदपत्रे नव्हती. ही कारवाई फिरत्या पथकाचे वनपाल एस. बी. जाधव, वन रक्षक पी. के. कांबळे, वनरक्षक एल. एम. गाडे, वाहन चालक ए. एम. तपसे यांनी केली.