बीडमध्ये ‘एआरटीओ’मधील काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:03 AM2018-06-07T01:03:02+5:302018-06-07T01:03:02+5:30

बीड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या असलेल्या उदासीनतेमुळे चर्चेत असतानाच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रुजू झाले. अधिकारी व कर्मचारी हजर असतानाही वाहनधारकांची कामे मात्र खोळंबल्याचे दिसून येत आहे.

The work in 'ARTO' in Beed is stalled | बीडमध्ये ‘एआरटीओ’मधील काम ठप्प

बीडमध्ये ‘एआरटीओ’मधील काम ठप्प

Next

बीड : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या असलेल्या उदासीनतेमुळे चर्चेत असतानाच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रुजू झाले. अधिकारी व कर्मचारी हजर असतानाही वाहनधारकांची कामे मात्र खोळंबल्याचे दिसून येत आहे.

गत आठवड्यातील वादळी वाºयांमुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झालेला आहे. तो अद्याप सुरळीत झालेला नाही. कार्यालयात सर्व कामकाज संगणकावर असल्याने वीजपुरवठ्यावर सर्व काही अवलंबून आहे. यासाठी एक अद्ययावत विद्युत जनरेटर उपलब्ध आहे. मात्र, तो धूळ खात पडलेला आहे.

कार्यालयात सोमवारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून राजकुमार वर्धेकर यांनी पदभार स्वीकारला. नेहमी गैरहजर राहणारे कर्मचारी यावेळी हजर झाले. मात्र वाहन चालक व मालकाला कामकाज ठप्प असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. आठ दिवसांपासून वाहन मालकांना कर ही भरता आलेला नाही. त्यामुळे शासनाच्या महसूल वसुलीवर परिणाम होत आहे.

यासोबतच शिकाऊ लायसनसाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या वाहन चालकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. मागील दीड महिन्यात बंद पडलेले वाहन हस्तांतरणचे कामकाजही सर्वजण हजर असताना ठप्प आहे. या सर्व बाबतीत वरिष्ठांनी चौकशी करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. बक्शु अमीर शेख यांनी केली आहे.

पूर्णवेळ अधिकारी नेमावा
अंबाजोगाई येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालया अंतर्गत अंबाजोगाईसह माजलगाव, वडवणी, केज, धारूर, परळी येथील वाहन नोंदणी, परिवहनाबाबतचा कारभार चालतो. काम करावयाचे असल्यास मध्यस्थांमार्फत जावे लागते. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होते. दरम्यान, येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयाचा अतिरिक्त प्रभार लातूरच्या परिवहन अधिकाºयाकडे दिलेला आहे. हे अधिकारी कधी तरी येतात. काम होण्यासाठी अनेकांना लातूरला जावे लागते. गैरसोय दूर करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राणा चव्हाण, नगरसेवक वाजेद खतीब, शहराध्यक्ष इस्माईल गवळी, नगरसेवक सुनिल व्यवहारे, शेख मुख्तार, शेख अकबर, सचिन चव्हाण, श्यामराव सरवदे, विलास काळुंके, फिरोज शेख यांनी केली.

Web Title: The work in 'ARTO' in Beed is stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.