बीड बसस्थानकाचे काम गतीने करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:33+5:302021-01-01T04:22:33+5:30
बील न भरणाऱ्यांवर कारवाई करा बीड : तालुक्यताली पालसिंगण येथे अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर आकडे टाकून विजेची चोरी केली ...
बील न भरणाऱ्यांवर कारवाई करा
बीड : तालुक्यताली पालसिंगण येथे अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर आकडे टाकून विजेची चोरी केली जात आहे. यामुळे वेळोवेळी विज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबधित अधिकाऱ्यांनी वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव बंद होण्यास मदत होणार आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
बाजारतळावर अस्वच्छता
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील बाजारतळ, तसेच बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतकडे स्वच्छतेची मागणी करून देखील स्वच्छता केली जात नाही. याकडे लक्ष घालून स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागात बस सोडण्याची मागणी
बीड : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात अनेक महिने बसेस बंद होत्या. आता त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. परंतु आजही अनेक गावांमध्ये बसेस धावत नाहीत. प्रवासी मिळत नसल्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगितले जात असले तरी सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.