अनेक गावात कंटेंटमेंट झोन करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:25 AM2021-04-29T04:25:22+5:302021-04-29T04:25:22+5:30
माजलगाव : येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागात कोरणा रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. नागरिकांमध्ये भितीचे ...
माजलगाव : येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागात कोरणा रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पंचायत समितीने गावात कंटेनमेंट झोन करणे आवश्यक असताना व त्यांनी चुकीचा प्रस्ताव पाठवल्याने ते प्रस्ताव तहसीलदार यांनी रद्द केले.
याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच बुधवारपासून अनेक गावात कंटेंटमेंट झोन तयार करण्यास सुरूवात करण्यात आली.
तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून कोरोणाने हाहाःकार माजवला आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. माजलगाव तालुक्यातील ३९ गावात कोरोनाचे पाचपेक्षा जास्त रुग्ण सध्या आहेत. सध्या वांगी , लवुळ ,नित्रुड , बडेवाडी , चोपनवाडी , सादोळा , भाटवडगाव ,चिंचगव्हान ,उमरी ,आबेगाव ,तालखेड , लोनगावसह २८ गावात पाचपेक्षा जास्त कोरोना रूग्ण आहेत.
पाचपेक्षा जास्त गावात कोरोना रुग्ण आढळलेली असतील तर त्या गावातील ग्रामपंचायतने पंचायत समितीकडे कंटेंटमेंट झोन बाबत प्रस्ताव पाठवल्यानंतर तहसीलदार यांच्या मान्यतेनंतर गावागावात कंटेनमेंट झोन तयार करण्यात येणार आहेत. पंचायत समितीने तालुक्यातील ३९ कंटेनमेंट झोनचे प्रस्ताव पाठवले होते परंतु त्यात अनेक त्रुटी असल्याने त्यास मान्यता मिळु शकली नाही.
याबाबत लोकमतने सोमवारी
' कंटेंटमेंट झोन तयार करण्यास पंचायत समिती असमर्थ , ३९ प्रस्ताव अपूर्ण ' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर बुधवारपासुन तालुक्यातील २८ गावात कंटेंटमेंट झोन तयार करण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली आहे.
===Photopath===
280421\purusttam karva_img-20210428-wa0028_14.jpg