निर्भिडपणे काम करा, अफवांवर विश्वास ठेवू नका -क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:02 AM2019-09-11T00:02:13+5:302019-09-11T00:03:26+5:30
विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करतो म्हणूनच कामे होऊ लागली आहेत. लोकशाहीच्या पहिल्या कसोटीत यश मिळवण्यासाठी आता योगदान द्या. आपली खरी ताकत आत्ताच कामाला लावा तरच पुढचे भवितव्य ठरणार आहे. निर्भिडपणे काम करा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रतिपादन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बीड : विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करतो म्हणूनच कामे होऊ लागली आहेत. लोकशाहीच्या पहिल्या कसोटीत यश मिळवण्यासाठी आता योगदान द्या. आपली खरी ताकत आत्ताच कामाला लावा तरच पुढचे भवितव्य ठरणार आहे. निर्भिडपणे काम करा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रतिपादन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
मंगळवारी शहरातील माँ वैष्णो पॅलेसमध्ये आदर्श शिक्षण संस्था पतपेढी, नवगण, विनायक कर्मचारी पतसंस्था व गजानन नागरी सहकारी बँक, खरेदी विक्र ी संघ सहकारी संस्था, गजानन सहकारी सुतगिरणी या संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी दिनकर कदम, विलास बडगे, अरूण डाके, शेषेराव फावडे, रविंद्र कदम, राजेश क्षीरसागर, गणपत डोईफोडे, मावराव मोराळे, अॅड.राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी क्षीरसागर म्हणाले की, येणारा काळ स्पर्धेचा आहे, आरक्षणाचे समर्थन करत असलो तरी पुढची पिढी गुणात्मक दृष्टीने पुढे जाणे गरजेचे आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी बीडचे लोक स्थायिक झाले आहेत. जिथे संधी मिळेल तिथे आपली माणसे गेली आहेत. विविध मोठ्या स्पर्धा परिक्षांमध्ये बीडच्या तरूणाईचा सहभाग वाढत आहे. शिक्षण क्षेत्रात होणारा बदल नवीन पिढीने स्विकारावा. समाजात विविध घटक आहेत. डॉक्टर, इंजिनिअर वगळता अन्य क्षेत्रातही तरुणांनी जायला हवे.
आपल्या संस्थेतून लाखभर मुले शिक्षण घेऊन मोठ मोठ्या पदांवर आहेत. सर्वांच्या सहकार्याने मला देखील मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करतो म्हणूनच कामे होऊ लागली आहेत. बीड जिल्ह्याची परिस्थिती बिकट आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न चालू आहेत. बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम जोमाने चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आदर्श शिक्षण संस्था, नवगण विनायक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी सखाराम मस्के, नानासाहेब काकडे, डॉ.राजू मचाले, एम.ए.राऊत, थिटे ए.एस., डॉ.कंधारे व्ही.एस., विश्वनाथ काळे, स्वामी एम.एस, मन्मथआप्पा हेरकर, डी.बी.आघाव, राजेंद्र मुनोत, अॅड.राजेश तांगडे, दत्तात्रय डोईफोडे, बाबासाहेब हिंदोळे, बालाप्रसाद जाजू, विश्वंभर सावंत, कोंडीराम निकम, कल्याण खांडे, बाबूराव राठोड, शेख नसीर, रंजीत आखाडे, कल्पना शेळके, किष्किंधा शिंदे, एस. बी. घोडके, आर. एम. कुºहे, व्ही. बी. बचुटेसह सर्व संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीराम जाधव यांनी केले. श्रीकांत कुलकर्णी यांनी आभार मानले.