निरा-भीमा जोडप्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:04+5:302021-01-24T04:16:04+5:30

कडा : निरा-भीमा जोडप्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, यामुळे आष्टी तालुक्यातील जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली येणार ...

Work on the Nira-Bhima project is nearing completion | निरा-भीमा जोडप्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे

निरा-भीमा जोडप्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे

Next

कडा : निरा-भीमा जोडप्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, यामुळे आष्टी तालुक्यातील जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली येणार आहे.

पावसाळ्यात कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून ते भीमा खोऱ्यात आणणारी आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाड्यासाठी संजीवनी देणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने १५ वर्षांपूर्वी घेतला होता, पण राजकारणापायी व राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून या योजनेचे काम प्रगतपथावर सुरू असून, डिसेंबर २०२२ पर्यंत योजना पूर्ण होणार असून तीन वर्षांत आष्टीकरांना हे पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे तालुक्यातील २७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याची माहिती माजी आ. भीमराव धोंडे यांनी दिली.

आष्टी तालुक्यात खुंटेफळ साठवण तलावात पश्चिम महाराष्ट्रातून एक टिएमसी पाणी येणार असून, या योजनेचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. बारामती तालुक्यातील निरा नदीवरील बोगद्याच्या ठिकाणी स्वत: श्री. धोंडे यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे बोलत होते.

कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांवर ओढवलेले महासंकट संपूर्ण देशाने पाहिले आहे. या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. शेकडो टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या निरा-भीमा जोडप्रकल्प योजनेतून एक टिएमसी पाणी आष्टी तालुक्याला मिळणार. या योजनेतील कायदेशीर अडखळे आता दुर झाले असल्याने या योजनेचे काम सुरू असून, २४ कि.मी.चा असलेल्या बोगद्याचे काम १४.५० किमी झाले असून,जवळपास ६५ काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २२पर्यंत ही योजना पूर्ण होणार असल्याची माहिती गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ श्रेणी-१ अधिकारी राहुल घनवट यांनी दिली. या योजनेचे काम पूर्णक्षमतेने २४ तास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

दर वर्षी पावसाळ्यात कृष्णेतील अतिरिक्त पाणी ११५ टीएमसी कर्नाटकात वाहून जाते. हे पाणी अडवून भीमा खोऱ्यात वळविल्यास दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. (यंदाच्या महापुरात कृष्णेतील सुमारे ७०० टीएमसी पाणी वाहून गेले आहे.) २००४ साली तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प शासनाकडून मंजूर करून घेतला होता. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत सुमारे पाच हजार कोटींची होती. सन २००४ लाच आमदार सुरेश धस यांनी आष्टी

तालुक्याला १ टिएममसी पाणी मिळावे म्हणून राज्य मंञीमंडळात मागणी करत चारशे कोटी रुपयांचा खुंटेफळ साठवण तलाव मंजूर करून घेतला. निरा-भीमा नदीजोड प्रकल्पासाठी आजमितीला खर्च सुमारे साडेसात हजार कोटींच्या घरात जातो, असेही माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले.

Web Title: Work on the Nira-Bhima project is nearing completion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.