सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने मलकापुर ते मांडवा रस्त्याचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 08:08 PM2018-03-30T20:08:28+5:302018-03-30T20:08:28+5:30

शहरापासून जवळच असलेल्या मलकापुर रोड ते मरळवाडी-मांडवा रोडच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख रुपये शासनाने मंजुर केले आहेत. चार किलोमिटर पैकी अडीच किलोमिटर काम हे झाले आहे. परंतु उर्वरित काम तीन महिन्यापासून ठप्प आहे. यामुळे ग्रामस्थांना या भागातून जातांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

work on the road from Malkapur to Mandwa stopped Due to the ignorance of the Public Works Department | सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने मलकापुर ते मांडवा रस्त्याचे काम ठप्प

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने मलकापुर ते मांडवा रस्त्याचे काम ठप्प

Next

परळी (बीड ) : शहरापासून जवळच असलेल्या मलकापुर रोड ते मरळवाडी-मांडवा रोडच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख रुपये शासनाने मंजुर केले आहेत. चार किलोमिटर पैकी अडीच किलोमिटर काम हे झाले आहे. परंतु उर्वरित काम तीन महिन्यापासून ठप्प आहे. यामुळे ग्रामस्थांना या भागातून जातांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता कार्यालय परळीच्या शिवाजी चौका जवळीच इमारतीत आहे. परंतु; या ठिकाणी उपकार्यकारी अभियंत्यांची उपस्थिती नसते. येथील अभियंते एस.बी. काकड हे अंबाजोगाईहूनच परळीचे काम पाहतात. यासंदर्भात उपकार्यकारी अभियंता एस.बी.काकड म्हणाले की, मलकापुर ते मांडवा रस्त्याचे काम पुर्ण करावेत यासाठी संबंधीत कंत्राटदाराला नोटीस देण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात हे काम सुरु करण्यात येईल. 

या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत  खाजगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मलकापुर ते मांडवा रोडवर झालेल्या अर्धवट कामही दर्जेदार नाही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍याचे लक्ष नाही व उर्वरित कामही केले नाही असा आरोप मलकापुर येथील महादेव फुलचंद गित्ते यांनी केला आहे.
 

Web Title: work on the road from Malkapur to Mandwa stopped Due to the ignorance of the Public Works Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.