बेवारस रुग्णांना सांभाळताना रुग्णालय कर्मचाऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 12:04 AM2020-02-09T00:04:14+5:302020-02-09T00:07:10+5:30

रस्त्यावर पडलेले, अपघात किंवा इतर मनोरुग्ण दिसताच सामाजिक कार्यकर्ते किंवा रुग्णवाहिकावाले त्यांना उचलून जिल्हा रुग्णालयात आणतात. त्यांच्यावर उपचार केले जाते. परंतु त्यांना भेटायला किंवा न्यायला कोणीच येत नाही.

Workout of hospital staff while handling helpless patients | बेवारस रुग्णांना सांभाळताना रुग्णालय कर्मचाऱ्यांची कसरत

बेवारस रुग्णांना सांभाळताना रुग्णालय कर्मचाऱ्यांची कसरत

Next
ठळक मुद्देबीड जिल्हा रुग्णालय । सुटी झाल्यानंतरही कोणीच येईना

बीड : रस्त्यावर पडलेले, अपघात किंवा इतर मनोरुग्ण दिसताच सामाजिक कार्यकर्ते किंवा रुग्णवाहिकावाले त्यांना उचलून जिल्हा रुग्णालयात आणतात. त्यांच्यावर उपचार केले जाते. परंतु त्यांना भेटायला किंवा न्यायला कोणीच येत नाही. त्यांना सांभाळताना परिचारीका, कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. सुट्टी झाल्यानंतरही अनेकदा हे रुग्ण रुग्णालयातच थांबतात.
माणुसकीच्या नात्याने रस्त्यावर पडलेले किंंवा इतर कोठे दिसताच आजारी लोकांना उचलून रुग्णवाहिकेतून अथवा खाजगी वाहनातून त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले जाते. त्यांची ओळख नसल्याने सुरूवातीची सर्व प्रक्रिया आणणारा व्यक्तीच करतो. त्यानंतर त्यांना वॉर्ड मध्ये अ‍ॅडमिट केले जाते. उपचारही केले जातात. तो बराही होतो. परंतु त्यांच्याकडे कोणीच येत नाही. त्यामुळे रुग्णालयातच बसून राहतात. पुढे त्यांचा सांभाळ रुग्णालय प्रशासनालाच करावा लागतो.
दरम्यान, मागील पाच दिवसांपासून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक पाच मध्ये तीन बेवारस रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्यावर उपचारही झाले आहेत. त्यातील एक रुग्ण मध्येच गायब होत असल्याने राखणदारी करावी लागत आहे. यात कर्मचाºयांना काम सोडून त्यांनाच पहावे लागत असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे नातेवाईक अथवा इतर कोणीच अद्याप आलेले नाहीत. हे रुग्णही स्वता:ची ओळख सांगत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

Web Title: Workout of hospital staff while handling helpless patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.