coronavirus : चिंताजनक ! अवघ्या १३ तासात कोरोनामुळे ६ रूग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 01:16 PM2020-08-12T13:16:17+5:302020-08-12T13:18:23+5:30

अंबाजोगाईतील ४, परळीतील एक आणि केजमधील एका रूग्णाचा समावेश

Worrying ! 6 patients died due to corona in just 13 hours | coronavirus : चिंताजनक ! अवघ्या १३ तासात कोरोनामुळे ६ रूग्णांचा मृत्यू

coronavirus : चिंताजनक ! अवघ्या १३ तासात कोरोनामुळे ६ रूग्णांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देतीन पुरूष आणि तीन महिला रूग्णांचा समावेश

अंबाजोगाई : कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्ये बरोबरच कोरोना रूग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याचे चिंतेचे वातावरण आहे. अत्यवस्थ झालेल्या कोरोना रूग्णांवर अंबाजोगाईतील स्वाराती रूग्णालयात उपचार करण्यात येतात. मंगळवारी रात्रीपासून अवघ्या १३ तासात सहा कोरोना रूग्णांचा स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यात तीन पुरूष आणि तीन महिला रूग्णांचा समावेश असून ते अंबाजोगाई, परळी आणि केज तालुक्यातील आहेत. 

परळीतील शांतीनगर येथील ६८ वर्षीय महिलेस सोमवारी सायंकाळी उपचारासाठी स्वाराती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा मंगळवारी रात्री १० वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी येथील ६० वर्षीय पुरूषाला रविवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांचा मंगळवारी रात्री १०.३० वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाईतील देशपांडे गल्लीतील रूग्णास मंगळवारी रात्री दहा वाजता दाखल केले होते. त्या रूग्णाचा बुधवारी पहाटे १.४० वाजता मृत्यू झाला. 

स्वाराती रूग्णालय परिसरातील शनिवारी पॉझिटीव्ह आलेल्या ६१ वर्षीय महिलेचा मंगळवारी रात्री ८.२० वाजता मृत्यू झाला. केजच्या अहिल्यादेवी नगर येथील रविवारी पॉझिटीव्ह आलेल्या ४६ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाईतील झारे गल्लीतील मंगळवारी पॉझिटीव्ह आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा बुधवारी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला.

Web Title: Worrying ! 6 patients died due to corona in just 13 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.