चिंताजनक; ७१६ नवे रूग्ण तर १० मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:34 AM2021-04-07T04:34:42+5:302021-04-07T04:34:42+5:30
जिल्ह्यात सोमवारी २ हजर २३७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाले. यात १ हजार ...
जिल्ह्यात सोमवारी २ हजर २३७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाले. यात १ हजार ५२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ७१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वाधिक १६१ कोरोना बाधित रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात निष्पन्न झाले आहेत. त्या पाठोपाठ बीड तालुक्यात १३१ नवे रुग्ण सापडले आहेत. मागील चार दिवसापासून अंबाजोगाई व बीड तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. याशिवाय आष्टी तालुक्यात ९८, धारुर २९, गेवराई ४३, केज ६४, माजलगाव ३४, परळी ८८, पाटोदा ३१, शिरुर ३१ व वडवणी तालुक्यात ६ बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा २८ हजार ४९१ इतका झाला आहे. यापैकी २५ हजार ४३६ जण कोरोनामुक्त झाले असून ६७२ जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार व साथरोग अधिकारी पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.या गावांत कोरोनाबळी
जिल्ह्यातील १० लोकांचा मंगळवारी कोराेनाने जीव घेतला. यात अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील ६० वर्षीय पुरुष, शहरातील ५४ वर्षीय महिला, परळी तालुक्यातील नागापूर येथील ६० वर्षिय पुरुष, जलालपूर भागातील ३५ वर्षिय पुरुष, परळी शहरातीलच ४८ वर्षिय पुरुष, बीड शहरातील मोमीनपुरा ५८ वर्षिय पुरुष, धानोरा रोड परिसरातील ७९ वर्षिय पुरुष, पेठबीडमधील ५५ वर्षिय पुरुष, माजलगाव तालुक्यातील उमरी येथील ६५ वर्षिय महिला, शहरातील शाहुनगर भागातील ६८ वर्षिय पुरुषाचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या ६७२ एवढी झाली आहे.