चिंताजनक; १० वर्षीय मुलासह पाच बळी, ९६३ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:34 AM2021-04-16T04:34:25+5:302021-04-16T04:34:25+5:30
जिल्ह्यात गुरुवारी ३ हजार ७९९ जणांच्या तपासणीचे अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले. यामध्ये २ हजार ८३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह ...
जिल्ह्यात गुरुवारी ३ हजार ७९९ जणांच्या तपासणीचे अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले. यामध्ये २ हजार ८३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ९६३ नवे रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक २३० रुग्ण आढळले. आष्टी ११६, बीड १६७, धारूर २५, गेवराई ४९, केज १०६ माजलगाव ७०, परळी ६९, पाटोदा ५९, शिरूर ४३ तर वडवणी तालुक्यात २९ नवे रुग्ण आढळून आले. तसेच ५५९ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. दरम्यान गुरुवारी आरोग्य विभागाच्या पोर्टलवर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यात, बीड शहरातील ६१ वर्षीय पुरुष, १० वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, राक्षसभुवन (ता.शिरूर) येथील ६५ वर्षीय पुरुष व आष्टी शहरातील ४८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३५ हजार ९५२ इतकी झाली असून ३१ हजार २६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण मृत्यूसंख्या ७३४ झाली आहे, अशी माहिती सीईओ अजित कुंभार, डीएचओ डॉ. आर. बी. पवार व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.