शेतकऱ्याच्या घरी मातीच्या बैलाची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:40 AM2021-09-07T04:40:40+5:302021-09-07T04:40:40+5:30
... सिध्देश्वर संस्थानात श्रावणी उत्सव साजरा शिरूर कासार : येथील सिध्देश्वर संस्थानवर परंपरागत श्रावणी उत्सव साजरा होत असतो. याही ...
...
सिध्देश्वर संस्थानात श्रावणी उत्सव साजरा
शिरूर कासार : येथील सिध्देश्वर संस्थानवर परंपरागत श्रावणी उत्सव साजरा होत असतो. याही वर्षी तो साजरा झाला. परंतु कोरोना चौकटीत असल्याने फारसा बोलबाला झालाच नाही. महिनाभर सिध्देश्वराचा नित्य अभिषेक, पूजा, पहाटे काकडा, भजन, सायंकाळी भजन असे कार्यक्रम झाले. आज अगदी साध्या पध्दतीने महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या हस्ते दहीहंडी फोडून श्रावण उत्सवाचा समारोप झाला.
...
बसस्थानकाच्या पाण्याला मिळाली तात्पुरती वाट
शिरूर कासार : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. स्थानकाभोवतीची मोठी घरेसुध्दा पाण्यात होती. अनेकांना याचा त्रास झाला. अखेर या पाण्याला वाट करून दिली. बसस्थानकातील पाणी काढण्याबाबत आमदार बाळासाहेब आजबे यांनीही सूचना दिल्या आहेत.
..
पोळा सण उत्साहात साजरा
शिरूर कासार : पिठोरी अमावास्या म्हणजेच पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी शेतकऱ्यांनी बैलांची पूजा केली. सकाळी सकाळी आज नदीवर बैल, दुचाकी वाहने धुण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सायंकाळी शेतकऱ्यांनी बैलांची मिरवणूक काढून पूजा, अर्चा केली.
...
आजोळातील वृद्धांची रक्त तपासणी
शिरूर कासार : तालुक्यातील राक्षसभुवन येथील आजोळ परिवार संस्था निराधार निराश्रितांचा आधार बनली आहे. त्यात दहा वयोवृध्द आश्रयाला आहेत. त्यांच्या खानपानाबरोबर आरोग्याचीही काळजी घेत सर्व वृध्दांची रक्त तपासणी केली असल्याचे संस्थेचे कर्ण तांबे यांनी सांगितले. वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.