वाह रे पठ्या! अवघ्या ४१ मिनिटं ५४ सेकंदात सर केले कळसूबाई शिखर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 01:12 PM2023-01-04T13:12:27+5:302023-01-04T13:12:53+5:30

अत्यंत अतिशय कठीण चढाई, अरूंद गुंतागुंतीचा मार्ग यासाठी कळसूबाई गड ओळखला जातो.

Wow! Kalsubai Peak was climbed in just 41 minutes and 54 seconds by Prajvalit Sasane | वाह रे पठ्या! अवघ्या ४१ मिनिटं ५४ सेकंदात सर केले कळसूबाई शिखर

वाह रे पठ्या! अवघ्या ४१ मिनिटं ५४ सेकंदात सर केले कळसूबाई शिखर

googlenewsNext

- नितीन कांबळे 
कडा (बीड):
आष्टी तालुक्याचा भूमिपुत्र वाकी गावातील तरुण प्रज्वलित गौतम ससाणे याने महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई गडाची चढाई अवघ्या ४१ मिनिट ५४ सेकंदात पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. कोरगाव -भीमा येथील १ जानेवारी रोजी शौर्यदिनाचे औचित्यसाधून प्रज्वलित याने हे शिखर सर करण्याची मोहीम फत्ते केली.

अत्यंत अतिशय कठीण चढाई, अरूंद गुंतागुंतीचा मार्ग यासाठी कळसूबाई गड ओळखला जातो. १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे शौर्यदिन साजरा करण्यात येतो. येथे विजयस्तंभाचे दर्शन घेतल्यानंतर प्रज्वलित टॉपर ट्रॅकर्स ग्रुपमधील साथीदारासह गडाकडे रवाना झाला. कळसूबाई हा अत्यंत कठीण गड त्याने अवघ्या ४१ मिनिटं व ५४ सेकंदामध्ये सर केला. यापूर्वी साजन भांगरे याने ४२ मिनिटांमध्ये गड सर केला होता. 

आता प्रज्वलित हा सर्वात जलद गतीने कळसूबाई शिखर सर करणारा ठरला आहे. यापुढेही दरवर्षी कोरेगाव-भीमा येथे शौर्यदिन साजरा करून कळसूबाई शिखर सर करण्याचा संकल्प प्रज्वलितने केला आहे. त्याने आतापर्यंत विविध ठिकाणावरील ४० किल्ले सर केले आहेत. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. 

Web Title: Wow! Kalsubai Peak was climbed in just 41 minutes and 54 seconds by Prajvalit Sasane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.