गेवराईत तलाठी मारहाणीच्या निषेधार्त महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:32 PM2018-06-30T18:32:57+5:302018-06-30T18:33:39+5:30
तालुक्यातील जातेगांव येथील तलाठी विठ्ठल आमलेकर यांना शुक्रवारी माफियाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याचा निषेध करत आज महसुल, तलाठी व कोतवाल संघटनांनी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले.
गेवराई (बीड) : तालुक्यातील जातेगांव येथील तलाठी विठ्ठल आमलेकर यांना शुक्रवारी माफियाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याचा निषेध करत आज महसुल, तलाठी व कोतवाल संघटनांनी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले.
शुक्रवारी जातेगाव येथील तलाठी विठ्ठल आमलेकर अवैद्य वाळू उपस्यावर कारवाई करत होते. यावेळी वाळू माफियांनी त्यांना अडवून मारहाण केली, तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू माफियांची अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढत असल्याने याच्या निषेधार्त आज महसूल, तलाठी, कोतवाल संघटनांनी लेखणीबंद आंदोलन केले. यावेळी सर्वांनी काळ्या फिती लावून तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या दिला. यानंतर नायब तहसिलदार अशोक भंडारी यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात तलाठी संघटनेचे अध्यक्ष जितेद्रं लेंडाळ, बी.डी.सुरवसे, दादासाहेब शेळके, एस.बी काकडे, बी.एच पखाले, एन.एन ठाकुर, गजानन देशमुख, यु.आर.खिडंरे, के.सी पुराणिक, एस.आर.तांबे आदींनी सहभाग घेतला.