शॉर्टकटसाठी राँग साईड चुकीची, वेळेची बचत ठरू शकते जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:58+5:302021-06-30T04:21:58+5:30

बीड : जिल्ह्यात सर्वत्र महामार्गांचे जाळे शहरालगत पसरले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी बायपास करण्यात आले आहेत. मात्र, लवकर पोहोचण्यासाठी ...

Wrong side for shortcuts can be wrong, time saving and life threatening | शॉर्टकटसाठी राँग साईड चुकीची, वेळेची बचत ठरू शकते जीवघेणी

शॉर्टकटसाठी राँग साईड चुकीची, वेळेची बचत ठरू शकते जीवघेणी

googlenewsNext

बीड : जिल्ह्यात सर्वत्र महामार्गांचे जाळे शहरालगत पसरले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी बायपास करण्यात आले आहेत. मात्र, लवकर पोहोचण्यासाठी राँग साईडने जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भीषण अपघात देखील घडले आहेत. मात्र, तरी देखील वाहनचालक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शार्टकटसाठी राँग साईडने जाणे महागात पडू शकते.

अनेकदा महामार्गावर राँग साईडने आल्यामुळे घडलेल्या अपघातांची संख्या जास्त आहे. तसेच भरधाव वेगातील वाहनांची जोरात धडक बसल्यामुळे यात मृत्यू होण्याचे प्रमाण देखील जास्तीचे आहे. कारण एका बाजूने वाहतूक असल्यामुळे, मोठ्या वाहन चालकांचे, राँग साईडने कोण येतोय याकडे जास्त लक्ष नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

...

या मार्गावर मोठ्या प्रमाणात राँग साईड प्रवास

बीड बायपास रामनगर

बीड शहराजवळील धुळे-सोलापूर महामार्गावरील रामनगर येथून बीड शहरात येण्यासाठी थेट राँग साईडचा सर्रास वापर केला जातो. याच मार्गावर दुचाकीला अपघात होऊन दोघेजण ठार झाल्याची घटना ताजी आहे.

...

बीड बायपास पाली

धुळे-सोलापूर महामार्गावरील पाली येथून बिंदुसरा धरणाकडे जाण्यासाठी अनेक वाहनचालक राँगसाईडचा वापर करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

...

पोलिसांचे दुर्लक्ष

शहरातील तहसील ते शाहूनगर आदर्श किंवा चाणक्यनगर भागात जाणारे राँग साईडने जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याकडे वाहतूक पोलिसांचे मात्र दुर्लक्ष असते.

...

सुभाष रोड

सुभाष रोड भागात बाजारपेठ असल्यामुळे नेहमी मोठी गर्दी असते. याच ठिकाणी वाहने चुकीच्या पद्धतीने पार्क केल्यामुळे वाहनचालक राँग साईडचा वापर करतात. त्यामुळे रोजच वाहतूक कोंडी होते.

...

जालना रोडवर सुसाट

जालना रोड भागात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक ते मोंढा रोड भागात जाण्यासाठी व त्या दिशेने येण्यासाठी अनेक वाहनचालक राँग साईडने येतात. पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते.

...

जनजागृतीची गरज

धुळे - सोलापूर महामार्गावर विविध ठिकाणी बायपास करण्यात आलेले आहेत. मात्र, या परिसरातील वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांच्या बाबतीत जनजागृती करणे गरजेचे आहे.

...

२०२१ मेपर्यंतचे अपघात २८२

जखमी १८०

मृत्यू १६०

राँग साईडमुळे झालेले अपघात ५५

मृत्यू ४५

जखमी ६५

..

महामार्ग पोलिसांकडून फक्त दंड वसुली

महामार्गावर वाहन चालकांकडून नियमांचे पालन व्हावे हे देखील महामार्ग पोलिसांचे काम आहे. मात्र, याकडे पूर्णत: दुर्लक्ष करून फक्त मोठी वाहने रस्त्यात कुठेही थांबवून अडवली जातात. त्यांच्याकडून विविध कारणांवरून दंड आकारला जातो. तसेच महामार्गावरून जाणाऱ्या मोठ्या वाहनचालकांकडे तर, एक प्रकारचा पास आहे का ते पाहिले जाते व सोडून दिले जाते. ती एक प्रकारची अनधिकृत वसुलीच असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.

Web Title: Wrong side for shortcuts can be wrong, time saving and life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.