पुरुषोत्तमपुरीत भाविकांची नौका उलटली; सुदैवाने जीवित हानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 04:57 PM2018-06-11T16:57:46+5:302018-06-11T16:57:46+5:30
अधिकमासनिमित्त देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर असलेल्या पुरुषोत्तपुरीत भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची नौका सोमवारी सकाळी १० वाजता गोदावरी नदीत उलटली.
माजलगाव : अधिकमासनिमित्त देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर असलेल्या पुरुषोत्तपुरीत भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची नौका सोमवारी सकाळी १० वाजता गोदावरी नदीत उलटली. प्रसंगावधान राखून बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी, ग्रामस्थांनी वेळीच नदीत उड्या घेऊन भाविकांचे प्राण वाचविल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. विनापरवाना चालणाऱ्या नौका बंद करण्याची मागणी ग्रामास्थातून होत आहे.
दर तीन वर्षानंतर येणाऱ्या अधिकमासात भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे मोठे महत्व आहे. देशात एकमेव मंदिर असलेल्या पुरुषोत्तमपुरीत सध्या भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. जालना, परभणी जिल्ह्यातील अनेक भाविक नौका, कलही, बोटीतून गोदावारीनदी पार करून पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येतात. सोमवारी दि. ११ सकाळी १० वाजता परतूर तालुक्यातील रेवलगाव, रामनगर येथील २८ भाविक एका बोटीतून दर्शनाला येत होते. बोट नदीपात्रात असताना अचानक उलटल्याने सर्व भाविक नदीपात्रातील पाण्यात पडले. काठावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तत्काळ पाण्यात उद्या घेऊन काही महिला भाविकांचे प्राण वाचविल्याने मोठी जीवितहाणी टळली. सर्व भाविकांना पाण्याच्या बाहेर काढून तत्काळ पुरुषोत्तमपुरी येथील खाजगी
...बोट उलटून जखमी झालेले भाविक
मंदाकिनी सुरवसे, शालन सुरवसे, गंगाराम लहाने, सविता घायाळ, अश्विनी घायाळ, चंद्रकला घायाळ, प्रयागबाई चव्हाण, इंदुबाई घायाळ, अशामती लहाने, राजाभाऊ घायाळ, बाळासाहेब भुंबर, सावित्रा घायाळ, इंदुबाई घायाळ, विजयमाला भुंबर, गीता कांबळे, मुक्ता लहाने, उमा घायाळ, गंगुबाई सुरवसे, अरुणा घायाळ, सुदामती साकळकर, मीरा मोगल, वच्छलाबाई शिंदे, संगीता थेटे, अनिता पवार, प्रियंका पवार, अभिषेक थेटे, गणेश थेटे, प्रांजल पवार (सर्व राहणार रेवलगाव, रामनगर तालुका परतूर जिल्हा जालना.
... यांनी वाचविले भाविकांचे प्राण
पोलिस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक डी.बी. मोरे, कर्मचारी एम.डी. वडमारे, ग्रामस्थ प्रकाश आबासाहेब ढोके, सचिन गोविंद लोखंडे,विकास शेषेराव लोखंडे, बालाजी लोखंडे.
...विनापरवाना चालतात बोटी
पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीपात्रात जवळपास वीस ते पंचवीस बोटी, कलही, नौका चालतात. दर्शनासाठी आलेले काही भाविक आनंद घेण्यासाठी नौका विहार करतात तर जालना, परभणी जिल्ह्यातील येणाऱ्या भाविकांना बोटीतून दर्शनासाठी यावे लागते. गोदावरी नदीपात्रात चालणाऱ्या सर्व बोटी या विनापरवाना असून त्या तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.