यात्रोत्सवातील तमाशाला फाटा, शाळेला दिली ३६ हजारांची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:16 AM2019-04-28T00:16:20+5:302019-04-28T00:17:00+5:30

आष्टी तालुक्यातील मसोबावाडी येथे यात्रेनिमित्त नेहमीप्रमाणे आयोजित करावा लागणार तमाशाचा कार्यक्र म रद्द करुन त्याऐवजी गावातील शाळकरी मुलांच्या कला गुणदर्शन कार्यक्रमाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी ३६ हजार रुपयांची देणगी दिली.

Yatotsav Tamashala Phata, donated 36 thousand donations to the school | यात्रोत्सवातील तमाशाला फाटा, शाळेला दिली ३६ हजारांची देणगी

यात्रोत्सवातील तमाशाला फाटा, शाळेला दिली ३६ हजारांची देणगी

Next
ठळक मुद्देप्रेरणादायी उपक्रम । मसोबावाडीत मुलांच्या गुणदर्शनाला ग्रामस्थांची दाद

लोकमत न्यूज नेटवर्क
अंभोरा : आष्टी तालुक्यातील मसोबावाडी येथे यात्रेनिमित्त नेहमीप्रमाणे आयोजित करावा लागणार तमाशाचा कार्यक्र म रद्द करुन त्याऐवजी गावातील शाळकरी मुलांच्या कला गुणदर्शन कार्यक्रमाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी ३६ हजार रुपयांची देणगी दिली.
मसोबावाडीत पहिली ते चौथीपर्यंत जि. प. ची शाळा आहे. दरवर्षी यात्रेत करमणुकीचे कार्यक्रम आणले जातात. मात्र यावर्षी मुख्याध्यापक सुभाष लांडगे व त्यांच्या सहशिक्षकांनी ग्रामस्थांशी संवाद साधत यात्रेनिमित्त शाळेतील मुलांच्या विविध कला गुणदर्शन कार्यक्रमाचा प्रस्ताव मांडला. ग्रामस्थांनीही या प्रस्तावाला संमती दिली. विविध गीत, नृत्य आणि नाटिकांचे मुलांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
उपस्थित पालक व ग्रामस्थांनी ३६ हजार रुपयांचे बक्षीस शाळेच्या विकासासाठी दिले. तमाशासारख्या कार्यक्रमावर पैसे उधळण्यापेक्षा विद्यार्थी ज्या ठिकाणी ज्ञानार्जन करतात त्या ज्ञानमंदिराच्या विकासासाठी ग्रामस्थांनी पैसे देऊन वेगळा आदर्श ठेवला आहे. यासाठी शिक्षक रावसाहेब शेकडे, आजिनाथ आमटे, केंद्रप्रमुख ज्ञानदेव आडसरे यांनी अथक प्रयत्न केले. सरपंच बुवासाहेब शेकडे, बाबाजी शेकडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान शेकडे,हरी शेकडे, सरपंच आजिनाथ चोपडे, शिवा शेकडे, कैलास शेकडे, भागवत शेकडे आदींची उपस्थिती होती. ग्रामस्थांनी यात्रेत एक नवा पायंडा पाडुन शाळेच्या विकासासाठी मोठी मदत केली आहे. तमाशावर मोठ्या प्रमाणात यात्रेत पैसे उधळले जातात. मात्र, मसोबावाडी येथील पालकांनी बदल करु न शाळेसाठी मदत दिल्याचे मुख्याध्यापक सुभाष लांडगे म्हणाले.
ग्रामीण भागात यात्रेठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले जातात. तमाशाचे आयोजन केले जाते. मात्र, मसोबावाडीतील शिक्षक व ग्रामस्थांचा छोटासा प्रयत्न आदर्श संदेश देत आहे.

Web Title: Yatotsav Tamashala Phata, donated 36 thousand donations to the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.