योगासने, प्राणायामातून ठेवा ऑक्सिजन पातळी समतोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:24 AM2021-04-29T04:24:42+5:302021-04-29T04:24:42+5:30
गेवराई : नियमित योगासने व प्राणायाम केल्याने कोरोना या रोगावर मात करून ऑक्सिजन पातळी संतुलित ठेवता येईल, असे ...
गेवराई : नियमित योगासने व प्राणायाम केल्याने कोरोना या रोगावर मात करून ऑक्सिजन पातळी संतुलित ठेवता येईल, असे मत योग शिक्षक रवींद्र नाटकर यांनी व्यक्त केले. तालुक्यात दररोज शंभरच्या वर रूग्ण निघत आहेत. काही रूग्ण एवढे गंभीर होत आहेत की, त्यांना पैसे खर्च करून ऑक्सिजन देण्याची वेळ येत आहे. काहींचा तर ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू होत आहे. परंतु नियमित योगासने व प्राणायाम केल्याने शरीरात ऑक्सिजन पातळी समतोल राखून प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊन कोरोना विषाणूंचा शरीरात झालेला शिरकाव नष्ट होऊ शकतो, असे योग शिक्षक नाटकर म्हणाले. कोरोना काळात मागील पाच ते सात महिन्यांपासून नियमित कोविड सेंटरवर जाऊन रूग्णांना प्राणायाम कसा करायचा व शरीरासाठी ते किती महत्त्वाचे आहे. कोणता प्राणायम केल्याने ऑक्सिजन पातळी समतोल ठेवू शकतो याची माहिती नाटकर देत आहेत. मंगळवारी त्यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय कोविड सेंटरवर रूग्णांना प्राणायाम व योगासने याचे धडे दिले.
===Photopath===
270421\2546sakharam shinde_img-20210427-wa0055_14.jpg