योगाचा सर्वदूर प्रसार व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:22 AM2021-06-23T04:22:15+5:302021-06-23T04:22:15+5:30
बीड : निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी योगाचा प्रत्येक घरापर्यंत प्रचार होणे आवश्यक आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ...
बीड : निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी योगाचा प्रत्येक घरापर्यंत प्रचार होणे आवश्यक आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्ष, बीड जिल्हा पतंजली योग समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राजेंद्र मस्के म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेवून पोहोचवले. निरोगी आयुष्यासाठी योगा आवश्यक आहे. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी दिलेली अमूल्य देणगी म्हणजे योग आहे, नित्य योग करणाऱ्यांना आजार होत नाहीत. योग हा जीवनाचा भाग झाला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देविदास नागरगोजे यांनी केले. महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. छत्रपती पांगारकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ओम प्रकाश झंवर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपप्राचार्य डॉ. राजेश ढेरे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ॲड. श्रीराम लाखे यांनी विविध आसने आणि प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून दाखवली.
जगासह संपूर्ण देशात २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने २१ जून रोजी सकाळी ६ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय, बीड येथे भारतीय जनता पार्टी व पतंजली योग समिती, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. प्रशांत तालखेडकर, अनंत देशपांडे, प्रा. गोपाळ धांडे, डॉ. अशोक डोके, राहुल पांडव, प्रदीप देशमुख, सलीम जहांगीर, अनिल चांदणे, संभाजी सुर्वे, संध्या राजपूत यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व योगसाधक नागरिकांनी ऑनलाईन सहभागी झाले होते.